अमळनेर: येथील द्रौ.रा.कन्याशाळेत गणित दिनानिमित्त विद्यार्थीनिंनी गणितीय मॉडेल बनवून गणित दिवस साजरा केला. गणित विषय शिक्षिका ललिता घ्यार पालवे या आठ दिवसांपासून गणितीय मॉडेल कसे बनवायचे याबाबतचे मार्गदर्शन करत होते.राष्ट्रीय गणित दिनाला विद्यार्थिनिंनी विविध विषय घेऊन गणित मॉडेल बनविले होते. विद्यार्थ्यांनी तीस मॉडेल बनविले त्यात तेजश्री सुतारने सममिती, निधी येवले हिने लिटर व वजन,संस्कृती पाटील ने भौमितिक साधने, हेमांगी महाजन ने एटीएम मशीन, जानव्ही पाटीलने व्हॅल्यू चार्ट, भौमितिक आकृती,मॅजिक बोर्ड,लावण्या पाटीलने गणित,बेरीज वजाबाकी,वर्गमूळ, चिन्हांचा चार्ट, संख्यांचे वर्ग करणे, मोजमाप पट्टी,बँक,एटीएम मशीन,तेजश्री बागुलने दिवस ओळखणे,सिद्धीका पाटीलने गुणाकार वजाबाकी, मयुरी पवारने रेषांचे प्रकार, घड्याळ रुपी पाढे, गणितीय चिन्हे, किलोमीटर, वजन चक्र ,दृष्टी पाटीलने स्केल व अंक असे
बऱ्याच विद्यार्थिनिंनी विविध मॉडेल बनविले होते. विद्यार्थीनिंनी बनविलेल्या मॉडेलची मांडणी करून प्रदर्शन भरविण्यात आले.त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील, क्रीडा शिक्षिका आर.एस.सोनवणे यांनी गणितीय मॉडेल प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यांनतर शालेय सकाळ व दुपार विभागाच्या विद्यार्थीनिंनी प्रदर्शन पाहिले.नंतर श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन चरित्रावर व गणित विषयावर भाषणे झाली. त्यावेळी विद्यार्थीनिंनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी गणित शिक्षिका ललिता घ्यार पालवे यांनी रामानुजन व आर्यभट्ट यांच्यावर माहिती दिली.शेवटी गणित मॉडेल बनविणाऱ्या सर्व विद्यार्थीनिंचा मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन शिक्षिका एस.एस.देवरे यांनी तर आभार एस.आर.कोळी यांनी मानले. गणित प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधूनी परिश्रम घेतले.