मंत्री अनिल पाटील यांची घेतली भेट
अमळनेर: तालुक्यातील नांद्री येथील निर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी नुकतीच मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांची भेट घेऊन आम्ही सारे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याची ग्वाही दिली.
मंत्री अनिल पाटील यांचा विकास हाच अजेंडा स्पष्ट दिसत असल्याने असेच विकासाभिमुख नेतृत्व आम्हाला हवे असून राष्ट्रवादी आणि अनिलदादा हे समीकरण निश्चितपणे या मतदारसंघात विकासाची नांदी निर्माण करेल असा आशावाद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या प्रसंगी माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, कामगार नेते एल.टी. नाना पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, नांद्री सरपंच हिराबाई लक्ष्मण भील, उपसरपंच अजय वसंत मालचे, ग्राम पंचायत सदस्य विमलबाई जिजाबरव महाजन, कविताबाई कांतीलाल चौधरी, कृष्णा हिमत नागो यांच्या सह ग्रामस्थ सुनील हिरालाल चौधरी, भानुदास रंगराव चौधरी, योगेश कुमावात, योगराज चौधरी, देविदास महाजन, राजुभाऊ चौधरी, गणेश महाजन, कांतीलाल चौधरी, नागो पाटील, भावलाल पाटील, दर्शन चौधरी, प्रशांत चौधरी, सागर पाटील, मयूर पाटील, राजू भिल, बबलू महाजन, लक्ष्मण भिलं, भूषण पाटील प्रणव चौधरी, राहुल पाटील, सुमित धोबी, रामदास भील, नंदू भील, लक्ष्मण महाजन, छोटू नाईक, प्रताप महाजन, प्रदीप भील यांच्या सह कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.