नव्या सबस्टेशनमुळे सुटला अनेक गावांचा विजेचा प्रश्न
अमळनेर: मतदारसंघातील पारोळा तालुक्यात असलेल्या शेळावे येथे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
ना. अनिल पाटील यांनी शेळावे येथील जनतेला संबोधित करताना शेळावे हे अतिशय सुसंकृत व सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव असून गावाच्या विकासासाठी निधी अपूर्ण पडू दिला जाणार नाही व विकासाच्या आड कोणतेही राजकारण होणार नाही असे प्रतिपादन करुन उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी शेळावे बु. चे सरपंच किरण पाटील यांनी अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या सब स्टेशन मुळे शेळावे सहित परिसरातील गावाच्या विजेचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवून दिल्याबद्दल व गावाच्या अभूतपूर्व विकासासाठी ना. पाटील यांचे आभार मानले.
या प्रसंगी अमळनेर कृषी उत्पन बाजार समिती सभापती अशोक पाटील, कामगार नेते एल.टी. नाना पाटील, शेळावे बु. येथील सरपंच सरपंच किरण पाटील मा.पं.स.उपसभापती दिपक पाटील, उपसरपंच निवृत्ती पाटील, अरुण पाटील, बंटी पाटील, विशाल कोळी, एन.टी. पाटील, गोरख भिल, महेंद्र पाटील, बापू पाटील, भीमराव नानाभाऊ, विनायक पाटील, नथा आबा,अक्षय पाटील, भैय्या पाटील, धर्मा आण्णा, किंगकाँग भिल, राजू भिल, बबलू पाटील, सुधाकर पाटील, शरद पाटील महेश, पाटील,इ. मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन- यावेळी मिनी
सबस्टेशन
3.85 कोटी, शेळावे बु. प्रवेशद्वार 15 लाख, मंडळ कार्यालय 25 लाख, तलाठी कार्यालय 25 लाख, बंधारे 53 लाख, सामाजिक
न्याय अंतर्गत रस्ता काँक्रे्टीकरण करणे 10 लाख, चौक सुशोभीकरण करणे 10 लाख, सामाजिक सभागृह बांधणे 15 लाख आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.