नरेश सोनवणे व रोहन बाविस्कर या दोघांची राज्यस्तरिय टेनिक्वाईट स्पर्धासाठी झाली निवड
अमळनेर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित शासकिय शालेय राज्य स्तरिय टेनिक्वाईट स्पर्धासाठी खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कुल अमळनेर च्या नरेश सुदाम सोनवणे (१४ वर्षाआतील ), रोहन कैलास बाविस्कर, (१७वर्षाआतील )ह्या दोघांची निवड राज्यस्तरिय स्पर्धासाठी झाली आहे.
सदर स्पर्धा दिनांक ८ते ११ डिसेबर २०२३पर्यत भानु तालिम व्यायाम शाळा मिरज जि.सांगली येथे संपन्न होणार आहे.
दोंडाईचा जि,धुळे येथे झालेल्या विभागिय टेनिक्वाईट शालेय स्पर्धेतुन त्यांची निवड करण्यात आली.सदर राज्य स्तरिय स्पर्धा मधुन राष्ट्रीय स्पर्धा चा संघ निवडला जाईल.
वरिल दोन्ही खेळांडुचा सन्मानचिन्ह देऊन सत्कांर करण्यात आला.खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष दादासाहेब श्री.डाॕ.अनिलजी शिंदे , कार्येपाध्यक्ष भाऊसो श्री.प्रदीपजी अग्रवाल व सर्व संचालक मंडळ,शालेय समिती चेअरमन आण्णासो श्री.हरी भिका वाणी , मुख्याध्यापक आबासाहेब श्री.बी एस पाटील सर, उपमुख्याध्यापक नानासाहेब श्री.सी एस पाटील सर , पर्यवेक्षक श्री.एस बी निकम , शिक्षक प्रतिनीधी श्री. ए डि भदाणे , जेष्ठ शिक्षक श्री डि एम दाभाडे , शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख श्री.एस एम पवार.श्री.एस आर शिंगाणे , श्री.सी एस सोनजे , श्री.के पी पाटील यांनी अभिनंदन करुन राज्यस्तरिय स्पर्धासाठी शुभेच्छा .
वरिल खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस पी वाघ सर व श्री.के आर बाविस्कर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.