अमळनेर भाजपाचा जल्लोष फटाके फुडून आनंद साजरा केला—-


अमळनेर : आज रोजी चार राज्यांमध्ये निकाल लागला असून यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दणदणीत विजय झाला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर देशाच्या जनतेने पुनःच एकदा विश्वास ठेवला आहे हे या निवडणुकीत दाखवून दिले आहे तसेच येणाऱ्या आगामी २०२४ लोकसभा व विधानसभा ची नांदी ठरू पाहणारी आहे या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने जोरात मुसंडी मारलेली आहे अमळनेर भाजपा तर्फे जल्लोष करण्यात आला महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आले त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला त्याठिकाणी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]