अमळनेर: पुणे वक्तृत्व व वाद मंडळ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे (MA-राज्यशास्त्र) विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार यांनी प्राप्त केलेल्या यशा बद्दल जेष्ठ इतिहास संशोधक प्रा डॉ सदानंद मोरे यांनी गौरव केला.
रोख रक्कम, मानपत्र व चषक देऊन निर्भय सोनार यांचा गौरव करण्यात आला.
राज्यभरातून 80 स्पर्धक असलेल्या या स्पर्धेत ‘संस्कृती स्लो साईनाईड आहे बायांसाठी !’ या विषयावर निर्भय सोनार यांनी प्रभावी मुद्दे मांडून रसिकांची दाद मिळविली. निर्भय हे अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विषयाचे पदव्युत्तर विद्यार्थी असून त्यांनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांना ऍड. सारांश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ ए. बी जैन, डिगंबर महाले, प्रा.डॉ नितीन पाटील, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा एस ओ माळी, प्रा डॉ रमेश माने, डॉ जि एम पाटील, संदीप घोरपडे, प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा एन.कांबळे, प्रा योगेश पाटील, योगेश पाटील, सतीश देशमुख, सचिन खंडारे, पत्रकार बांधव व सुवर्णकार समाजाने निर्भय सोनार अभिनंदन केले.