अमळनेर:- येथील माजी जिल्हापरिषद सदस्या तथा माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांचा वाढदिवस काल दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी अमळनेर येथील आरोग्यम चाईल्ड ( बाल रूग्णालय) डॉ.विशाल रा.बडगुजर व उत्कर्ष मेडीकल चे सौ.मनिषा विशाल बडगुजर यांनी ताईसाहेब सौ.जयश्री पाटील यांना आग्रहाचे निमंत्रण देऊन वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कारासह अनेक डॉक्टर व समाज बंधू भगिनींचे उपस्थितीत सुंदर मंडप सजावटीत सौ.जयश्री ताईंचे उपस्थित महिलांनी औक्षण केले व सौ.जयश्री ताईंनी चि.देवांशू( दक्ष) हितेंद्र बडगुजर सह याचाही तिसरा वाढदिवस असल्याने समवेत केक कापून वाढदिवसाच्या आनंदात सर्वांना सहभागी केले.आलेल्या मंडळींनी आणि निमा तालुका संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ विशाल बडगुजर, सचिव डॉ महेश रमण पाटील , उपसचिव डॉ चेतन पाटील, खजिनदार डॉ तुषार परदेशी, डॉ रईस बागवान, डॉ दिनेश पाटील, डॉ रूपाली पाटील, डॉ अतुल चौधरी, डॉ लिना चौधरी, डॉ कमलेश भावसार, डॉ अक्षय न्हाळदे, डॉ माधूरीन्हाळदे डॉ सचिनपाटील, डॉ राजेंद्र ठाकरे, डॉ राहूल काटे, गणेश भामरे, जयदीप पाटील व पत्रकार बंधूंनी उपस्थिती देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला .
वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना केली फळे वाटप
तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.नगाव येथील महेश पाटील यांनी फळे व बिस्किट उपलब्ध करून दिले,यावेळी सौ जयश्री पाटील तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,इम्रान खाटीक,योगेश पाटील,जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील, खाटीक सर तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच काल त्यांच्या निवासस्थानी गर्दी झाली होती,यावेळी नामदार अनिल पाटील हे देखील उपस्थित होते.विशेश करून महिला भगिनींची मोठी गर्दी यावेळी झाली होती.रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता,अनेकांनी सामाजिक उपक्रम आयोजित केले असल्याने तेथेही दिवस भरात सौ.जयश्री ताईंनी हजेरी लावून अनेकांची मने जिंकली.