दुःखद घटना:अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू

अमळनेर :तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनर ला धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे वय ५५ रा बेटावद व योगेश धोंडू साळुंखे रा अर्थे ता शिरपूर हल्ली मुक्काम पिंपळे रोड अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडी क्रमांक एम एच ०४ ,९११४ मध्ये व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब
एक गाडीत अशा दोन चार चाकींवर राजस्थान फिरायला जात असताना १३ रोजी दुपारी दोन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनर ला धडक दिल्याने धनराज सोनवणे , त्यांची सुरेखा धनराज सोनवणे वय ५० , मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे वय ५ वर्षे , गायत्री योगेश साळुंखे वय ३० , प्रशांत योगेश साळुंखे वय ७ , भाग्यलक्ष्मी साळुंखे वय १ यांचा जागीच मृत्यू झाला. मंत्री अनिल पाटील यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी बोलणे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]