
नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याने पोह. डॉ.शरद पाटील यांचा अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे यांनी केला सत्कार….
अमळनेर: सविस्तर वृत्त असे की, मानव अधिकार जनजागृती प्रित्यर्थ नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वाद विवाद स्पर्धा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो.नाशिक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होती. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोह. डॉ.शरद पाटील यांनी प्रतिनिधित्व केले व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला व जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकिकात भर पाडली आहे..
पोह. डॉ.शरद पाटील केलेल्या अविस्मरणीय कामगिरीचा सन्मान म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत पोह. डॉ.शरद पाटील यांचा सत्कार केला व आपल्या अधिनस्थ अंमलदारने केलेल्या कामगिरीचा येथोचीत सन्मान केला..
नमूद कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.श्री. विजय शिंदे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, पोलीस खात्यात काम करतांना स्वतःला अद्यावत ठेवणे अत्यंत मुश्किल गोष्ट! अशाही परिस्थितीत डाॅ.शरद पाटील सारखे हिरे स्वयंप्रकाशाने चमकतात ही केवळ आपल्यासाठी नाही तर पोलीस खात्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आम्हास याचा सार्थ अभिमान आहे पोलीस स्टेशन चा तू गौरव आहेस! अशा शब्दात नावलौकिक करून सोबतच्या अमलदारांना देखील प्रेरणा दिली आहे..
नमूद कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्या सोबतच्या अंमलदाराने केलेल्या कामगिरीमुळे एक वेगळा उत्साह दिसून आला..