अमळनेर: विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह ग्रामस्थ मंडळीने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांची अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट घेतली.
यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक करत बिनविरोध झालेल्या पदाधिकारींचा सत्कार केला.गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.या प्रसंगी सरपंच अधिकार वाल्मीक पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप बळीराम पाटील, सागर आबा पाटील, सुखा वना निकम, प्रकाश विरभान पाटील, ईश्वर जोगी, दीपक रमेश पाटील, भूषण ईश्वर पाटील, रवींद्र लटकन पाटील, गुलाब वंजारी यांच्या सह पोलीस पाटील लहू पाटील व ग्रामस्थ ईश्वर दगा पाटील, राम उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, छोटू पाटील, कौतिक पाटील, प्रमोद पाटील, भिमराव पाटील, विनायक पाटील, बापू पाटील, धोडा पाटील, भटू पाटील, उगमराव पाटील, श्याम पाटील आदी उपस्थित होते.