मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

मारवड ता.अमळनेर: येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला , याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले.प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.पवन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी नुकतेच विद्यार्थी विकास समन्वय समिती क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव. सदस्य पदी निवड झालेले प्रा.डाॅ. पवन पाटील यांचा प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्या हस्ते सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे
वेळी क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव
‘युवारंग’चे विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रा. विजय पाटील यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते, शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]