अभी नही तो कभी नही

अमळनेर: आपला अमळनेर तालुका धुळे ॓ अवर्षण ग्रस्त ॔ जिल्ह्याच्या सीमा लगत , शेजारी असलेला तालुका 80 ते 90 / टक्के शेती कोरडवाहू पण पुर्वी निसर्गाची साथ असलेल्या ने ॓पाऊस॔ वैगेरे वेळेवर होत असल्याने शेतीचे उत्पादन चांगले होते, कापूस, शेंगदाणे, तिळ तेलबिया व ज्वारी, बाजरी अन्नधान्याचे उत्पादन चांगले होत होते म्हणून आपल्या अमळनेर तालुक्यात शेती मालावर आधारित उद्योगधंदे प्रतापशेठ कापड मिल , विप्रोसनफ्लाॅवर ॓ डालडा तुपाचा ॔ कारखाना, होता तसेच ,आर के पटेल टोबॅको असे विकसित,औद्योगिक शहर असल्याने रेल्वे, पक्के रस्ते मोठ्या शहरांना जोडले होते तसेच शैक्षणिक बाबतीत पुण्यानंतर अमळनेर होते तसेच धार्मिक बाबतीत प्रती पंढरपूर म्हणून अमळनेर ची ओळख होती तालुका म्हणून अमळनेर ची ओळख होती पण आज निसर्गाच्या लहरी पणामुळे व अनियमित पाऊस मुळे तसेच तालुक्यातून तापी, पांझरा व बोहरी सारख्या मोठ्या नद्या आहेत त्याचे हजारो टी एम सी पाणी दरवर्षी वाहून जाते.नद्या असताना सिंचनाचे प्रमाण ॓0 ॔ शुन्य टक्के आहे. म्हणून आज शेतीचे उत्पादन बेभरवशाचे झाले आहे . तसेच अमळनेर चे उद्योग धंदे पुर्ण बंद झाले असल्याने आर्थिक परिस्थिती,आर्थिक चक्र लयाला गेले आहे आज अमळनेर औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या शहर आज उद्योग धंदे पुर्ण बंद असलेले शहर म्हणून ओळख आहे. अमळनेर तालुक्याला शेती साठी व शहरालाऔद्योगिक करण गतवैभव प्राप्त होण्यासाठी पाडळसरे धरणाचे बांधकाम पूर्ण होणे अमळनेर साठी महत्त्वाचे आहे.जिल्यात जलसंपदा मंत्रीपद लाभले होते पण आपल्या योगदान लाभले नाही. आज नामदार श्री दादासो. अनिल दादा पाटील यांच्या रूपाने अमळनेरला मंत्री पदमीळाले आहे त्यांची इच्छा पाडळसरे बांधकाम पूर्ण होण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न आहेत. केंद्राच्या जल आयोगाच्या परवानगी साठी प्रयत्न करीत आहेत . जल आयोगाच्या परवानगी नंतर पी एम धरण योजना मधून पाडळसरे धरणाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी पुर्ण निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत . तसेच आपल्या तालुक्या सारखी धुळे जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थिती आहे पण सिंचनाचे प्रमाण आपल्या अमळनेर तालुक्या च्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे . धुळ्याचे खासदार डॉ. बाबासो. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नानी वर्षी, दबाशी या गावा जवळून तापी नदीतून पाईप लाईन द्वारे जामफळ सोनगीर जवळ धरणाचे बांधकाम करून त्या धरणात पाणी ने जोडले जाणार आहे पुळे हि पाईप लाईन शिरूड चौफुली नंदाळे धरणात जोडले जाणार आहे. अशा प्रकारे धुळे तालुक्यात सिंचनाचे काम सुरू आहेत. आपल्या तालुक्यात पण नामदार श्री दादासो अनिल दादा पाटील यांच्या बरोबर माजी आमदार श्रीमती . ताईसो स्मिता ताई पाटील यांच्या कळुन पण तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत यांनी पण पाडळसरे धरणा साठी व आपल्या नसर्डी धरणासाठी व तालुक्यातील इतर नदी जोड साठी कै. उदयबापुंचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जमेल तेव्हढे प्रयत्नराल नामदार श्री दादासो अनिल दादा पाटील व माजी आमदार श्रीमती स्मिता पाटील व अनुभव म्हणून आपल्या अमळनेर येथे तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आदरणीय माजी आमदार श्री. दादासो साहेबराव दादा पाटील यांनी पण स्वतः मदत केली पाहिजे . नामदार श्री दादासो अनिल दादा पाटील यांच्या प्रयत्नाना माजी आमदार श्रीमती. ताईसो स्मिता पाटील व माजी आमदार श्री. दादासो साहेबराव दादा पाटील यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानी लवकर धरणाच्या बांधकाम पूर्ण होईल व जास्त वेळ लागणार नाही . आज आपल्या अमळनेर तालुक्याला मंत्रीपद लाभले आहे म्हणून पाडळसरे धरणाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी व पाईप लाईने नदी जोड मंजूरी साठी आजची सध्याची परिस्थिती अतिशय महत्त्वाचा योगआहे. म्हणून ॓ अभिनही तो कभी नही ॔. आज झाले तर बरे नाही तर पुढे बरिच प्रतीक्षा करावी लागेल असे वाटते. तसेच आदरणीय खासदार श्री दादासो . उन्मेष दादा पाटील यांनी पण आदरणीय श्री दादासो अनिल दादा पाटील यांना पाडळसरे धरणाचे बांधकाम साठी केंद्रीय जल आयोगाच्या परवानगी लवकर मिळवण्यासाठी मदत करावी तसेच पी एम आयोगा कळून धरणाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी पुर्ण निधी मिळणे साठी मदत करावी व
तसेच तापी नदीतून अमळनेर तालुक्यातील निसर्डीधरण व तालुक्यातील इतर नदीना पाईपलाईन द्वारे जोडण्यासाठी निधी व मंजूरी साठी धुळे जिल्ह्यातील खासदार डॉ बाबासो. भामरे साहेबांन सारखी मदत करू लवकर एक दोन महिन्यात काम सुरू होण्यासाठी मदत करावी. उशिरा झाला तर नंतर फक्त निधी मंजूर केला जातो पण काम सुरू होत नाही व निधी मंजूरी साठी अजून 5 वर्षे वाट पाहावी लागते तसे न होता निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावा व अमळनेर साठी आपले योगदान मिळावे ही नम्र विनंती आपला नम्र अरूण शिंदे सर बोरगाव ता अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]