युवा संघर्ष यात्रा च्या प्रभारी पदी श्री उमेश पाटील यांची नियुक्ती

820 किमी असणार पदयात्रा!:युवांच्या विविध प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांची पुणे ते नागपूरपर्यंत काढणार पायी युवा संघर्ष यात्रा

युवा संघर्ष यात्रा च्या प्रभारी पदी श्री उमेश पाटील यांची नियुक्ती

820 किमी असणार पदयात्रा!:युवांच्या विविध प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांची पुणे ते नागपूरपर्यंत काढणार पायी युवा संघर्ष यात्रा

अमळनेर: युवा संघर्ष यात्रा च्या प्रभारी पदी श्री उमेश पाटील यांची आज पुणे येथे आ.रोहित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.आ. रोहित दादा पवार हे 24 ऑक्टोबर पासून युवा संघर्ष यात्रेची सुरुवात पुणे येथून करणार असून त्याचा शेवट 6 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. 820 km. एकूण अंतर 42 दिवसात पूर्ण होणार आहे. संपूर्ण बेचाळीस दिवस आमदार रोहित दादा पवार हे पायी चालणार आहेत व त्यांच्यासोबत शेकडोच्या संख्येने युवक पदयात्रेत सहभाग घेणार आहेत. त्या पदयात्रेच्या नियोजनासाठी श्री उमेश पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील बदललेल्या राजकारणामुळे राज्यातील तरुणांची राजकारणाकडे पाहण्याची मानसिकता ही बदलत चालली आहे.तसेच तरुणांचे अनेक प्रश्न हे राज्य सरकारकडे प्रलंबित असून तरुणाच्या विविध प्रश्न हे लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे येत्या 24 तारखेपासून दसऱ्याच्या दिवसापासून पुणे ते नागपूर असा पायी पदयात्रा काढणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

आज राज्यात शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य युवांना बसत आहे. शासनाच्या या धोरणांचा राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. अशातच राज्याच्या विविध भागात युवावर्ग आंदोलन देखील करत आहे. परंतु सरकार मात्र आपल्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे युवा वर्गाच्या या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फी परवडत नसल्याने फी कमी करण्याची मागणी विधानसभेत आम्ही आग्रहीपणे मांडली यावेळी सिरीयसनेस यावा यासाठी परीक्षा फी १००० रुपये ठेवल्याचे सरकारने सांगितले. पेपरफुटी संदर्भात सांगितलं तर सरकार हक्क भंग आणण्याची भाषा करते, कंत्राटी भरतीचा मुद्दा मांडला तर सरकार सांगते एका कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कर्मचारी काम करतील.

एकूणच सरकारच्या संवेदना संपल्या असून सरकार युवकांना गृहीत धरून चालत आहे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही आदरणीय पवार साहेबांशी याबाबत चर्चा केली आणि यावेळी पवार साहेबांनी राज्यव्यापी युवा संघर्ष यात्रा काढून युवांशी संवाद साधण्याच्या सूचना आम्हाला केल्या त्यानुसारच राज्यातील तमाम तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि युवा वर्गाला पाठिंबा देण्यासाठी एका नवीन उपक्रमाची सुरुवात आपण करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

राजकारणात आल्यापासून युवकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतोय. सद्यस्थितीत राजकारणाची पातळी घसरत असल्याने आपण राजकारणात का आलो असा प्रश्न मनात आला होता. पण हार मानून घरी बसण्यापेक्षा लढत राहायचे आणि काम करायचे असा निर्णय घेतला. ‘युवकांचे प्रश्न सुटत नाही त्यासाठी काय केले पाहिजे’, याबाबत शरद पवार यांच्याशी नुकतीच चर्चा केली. त्यावर ‘युवकांचे प्रश्न हातात घ्या. त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करा’, असा सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी युवकांशी राज्यभर संपर्क साधण्यासाठी संपर्कयात्रा काढता येईल, असे मनात आले. कुटुंबांशी, पत्नीशी बोललो. त्यांना माझी भूमिका सांगितली. त्यामुळे युवकांच्या प्रश्नांसाठी ‘युवा संघर्ष यात्रा’ ही पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
या पदयात्रेच्या नियोजनासाठी श्री उमेश पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]