अमळनेर: कलाशिक्षकांची वार्षिक आढावा बैठक प्रताप हायस्कूल येथे सम्पन्न झाली.त्यावेळी कलाध्यापक संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली
तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत कंखरे,उपाध्यक्षपदी आदर्श हायस्कूल मांडळ येथील दिनेश सूर्यवंशी, ढेकू शाळेचे श्रावण सोनवणे,सचिवपदी डी.आर.कन्या शाळेचे दिनेश नामदेव पालवे, सहसचिव पदी सार्वजनिक विद्यालय सारबेटे येथील सूर्यकांत निकम,कार्यकारणी सदस्य पदी दहिवद शाळेचे भटेश्वर
भदाणे,धार शाळेचे भूषण पाटील,रणाईचे शाळेचे विजय कापडनिस, महिला सदस्या म्हणून मंगरूळ शाळेच्या सीमा मोरे,पिळोदे शाळेचे सुनीता देवरे,एन.टी. मुंदडा हायस्कूलचे भाऊसाहेब पाटील,लोंढवे शाळेचे दिपक वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.नवीन कार्यकाररी निवड झाल्यानंतर वर्षभरात विशेष प्राविण्य मिळवलेल्या कला शिक्षकांचा गौरव करण्यात आला.तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना तालुक्यातील सर्व कला शिक्षकांनी सत्कार केला. त्यावेळी कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सचिन साळुंखे, भूषण सोनवणे, योगेश चौधरी,मनोहर महाजन, साखरलाल माळी, गणेश सातपुते, मनोहर पाटील व तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे कला शिक्षक उपस्थित होते.