सौ.राजपूत तृप्ति मनोज यांची खडके पोलिस पाटील पदी झाली निवड….


अमळनेर: महाराष्ट्र शासनातर्फे नुकतीच पोलिस पाटील भरती राबविण्यात आली त्यात खडके पोलिस पाटील पदी सौ.राजपूत तृप्ति मनोज यांची वर्णी लागलेली आहे.
सौ. राजपूत तृप्ति मनोज यांनी पोलिस पाटील पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत 80 पैकी 66 येवढे सर्वोच्च गुण मिळवुन आपल मानस राखला आहे.
खडके वाशीयांना मितभाषी, सुशिक्षित,संयमी असे व्यक्तिमत्व असलेले पोलिस पाटील सौ. राजपूत तृप्ति मनोज यांच्या स्वरुपात प्राप्त झालेल आहे, एकूण दोन टप्प्यात लेखी परीक्षा व मुलाखत अश्या दोन टप्प्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया करण्यात आली. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी अगदी पारदर्शक पणे मुलाखतीचा टप्पा पार पाडला व आज अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली त्यात सौ. राजपूत तृप्ति मनोज यांना मुलाखती मध्ये 20 पैकी 8 व लेखी परीक्षेत 80 पैकी 66 एकूण 74 मार्क मिळवून पोलिस पाटील पदी विराजमान होतील. त्यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

[democracy id="1"]