शेतकी संघाच्या प्रेसिडेंट पदी संभाजी पाटील तर व्हाइस प्रेसिडेंट पदी गणेश भामरे बिनविरोध

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आमदार अनिल पाटील यांचे वर्चस्व

अमळनेर(प्रतिनिधी):-
येथील तालुका शेतकी संघाच्या प्रेसिडेंटपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर व्हाइस प्रेसिडेंट पदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने संचालक मंडळाने दोघांची निवड केली.
अमळनेर तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनल चे १०,काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनल चे ३, तर भाजप प्रणित किसान विकास पॅनल चे २ संचालक निवडून आले होते.आमदार अनिल पाटील यांनी शेतकी संघावर एकहाती वर्चस्व मिळविल्याने सत्तेची सर्व सूत्र त्यांच्या हातात होती.
प्रेसिडेंट व व्हाइस प्रेसिडेंट पदाच्या निवडणुकीची प्रकिया १९ रोजी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पार पडली.यावेळी सहकार पॅनल चे संचालक संजय पुनाजी पाटील,सचिन बाळू पाटील,विक्रांत पाटील, नितीन पाटील,रणजीत पाटील,शंकर बैसाने,सुषमा देसले, मालुबाई पाटील, शेतकरी पॅनल चे सुरेश पाटील, प्रा. शाम पवार तर किसान विकास पॅनल चे जितेंद्र पाटील व प्रफुल पवार उपस्थित होते.निर्धारित वेळेत सत्ताधारी गटातील फक्त दोघांचे फॉर्म प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील तर सहाय्यक अधिकारी सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्या :- आमदार अनिल पाटील
आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित प्रेसिडेंट संभाजी पाटील व व्हाइस प्रेसिडेंट गणेश भामरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की,तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वाची असलेली संस्था जनतेने आपल्याला विश्वासाने सोपविली आहे त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.येणाऱ्या काळात संघाची बळकटी करून संघाचे उत्पन्न कसे वाढेल यावर भर द्यावा लागणार आहे,सोबतच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राध्यान्य द्यावे लागणार आहे.वेळप्रसंगी कर्ज घ्याव लागलं तरी चालेल पण उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागणार आहेत.विरोधकांनी कितीही खोट्या वल्गना केल्या तरी शेतकऱ्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला आपल्याला जपायचे असल्याचे त्यांनी सांगितले. पद मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते मात्र ज्यांनी त्याग केला आहे त्यांना देखील येणाऱ्या काळात संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले,सोबतच पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी पॅनल निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली आहे त्यांना तज्ञ संचालक पदी संधी देण्यात यावी असे त्यांनी संचालक मंडळाला आवर्जून सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी प्रस्ताविक केले तर नवनिर्वाचित व्हाइस प्रेसिडेंट गणेश भामरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील,बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,तिलोत्तमा पाटील,शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेसिडेंट संभाजी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
नवनिर्वाचित प्रेसिडेंट संभाजी पाटील हे जरी सहकार पॅनल मधून निवडून आले असले तरी ते काँग्रेस पक्षात होते मात्र प्रेसिडेंट निवडणुकीच्या आधीच संभाजी पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला,त्यामुळे पक्षाची देखील ताकद वाढली आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें