तीन महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
पाचोरा: शहरातील गोविंद नगर भागातील राहत्या घरानजीक
असलेल्या विहिरीत उडी घेत एका १९ वर्षीय नवविवाहितेने
आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १३ जुलै रोजी
पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आलेी असून
विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत
असल्यानेच विवाहितेने आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा
तालुक्यातील कुन्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा
प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड
हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस
चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस आजल
सासु सुग्राबाई चव्हाण सासु मुक्ताबाई
चव्हाण चुलत सासु पार्वतीबाई
चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असल्याने
त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणार्या भांडणामुळे राहुल
चव्हाण हा १० जुलै रोर्जी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद
नगर भागात भाङ्याची खोली घेऊन राहायला अआला होता.
दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे
पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला आअसलेल्या विहिरीत
उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्र संपवली.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात
आली असून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम
सुरू आहे.