करणखेडे येथील व्ही वाय पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावीत घवघवीत यश, शंभर टक्के निकाल

करणखेडे, अमळनेर – येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित विनायकराव यादवराव पाटील माध्य. विद्यालय, करणखेडे येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. पाटील समीक्षा किशोर (मुडी) हिने 90.20 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर कु. कोळी देवयानी दिनकर (करणखेडा) 89.60% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. लोखंडे पौर्णिमा सुधाकर (करणखेडा) हिने 87.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष श्री.आबासो.जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

[democracy id="1"]