डांगरीच्या सुपुत्राची उल्लेखनीय कामगिरी श्री. रमेश कृष्णा बडगुजर यांची उपनिरीक्षक (Sub Inspector) पदावर बऱ्हाणपूर येथे पदोन्नती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उपनिरीक्षक (Sub Inspector) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल श्री. रमेश कृष्णा बडगुजर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा

अमळनेर,- हितेंद्र बडगुजर : अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील सुपुत्र श्री. रमेश कृष्णा बडगुजर यांची सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) पदावरून उपनिरीक्षक (Sub Inspector) पदावर पदोन्नती होऊन त्यांची बऱ्हाणपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. बडगुजर यांनी आपल्या सेवाकाळात खंडवा, खरगोन आणि बऱ्हाणपूर येथे प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि जनसेवेची भावना जपत उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने त्यांना उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली असून, ही पदोन्नती त्यांच्या दीर्घकालीन परिश्रम, समर्पण आणि निष्ठेची पावती मानली जात आहे.
त्यांच्या या यशाबद्दल डांगरी गाव, अमळनेर तालुका तसेच बडगुजर समाजात आनंदाचे वातावरण असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी श्री चामुंडा माता मंदिर, अमळनेर तसेच बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर यांच्या वतीने श्री. रमेश कृष्णा बडगुजर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या भावी सेवाकार्यात उत्तरोत्तर यश लाभावे व समाजाचे नाव अधिक उंचवावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें