दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी अमळनेरात रविवारी सर्वपक्षीय शोकसभा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा दमदार आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यासह अमळनेर तालुक्यावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामूहिक व सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी
 स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर
 दि. १ फेब्रुवारी
⏰ सकाळी ९.०० वाजता
येथे भव्य सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, महिला मंडळ, लायन्स व रोटरी क्लब, महसूल संघटना, वकील संघ, पत्रकार संघटना, धरण संघर्ष समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक संघ, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन, स्वामीनारायण संस्था, संत सखाराम महाराज वाडी संस्थान, भाजीपाला विक्रेते, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आजी-माजी नगरसेवक, एस.टी. कर्मचारी, टॅक्सी युनियन, सर्व समाज पंचमंडळ तसेच इतर सर्व संस्था व संघटनांना या शोकसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अजितदादा पवार आणि अमळनेरचा विकास यांचे गेल्या २५ वर्षांपासून अतूट व जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. अमळनेरच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या ऋणातून अमळनेर कधीही उतराई होऊ शकत नाही. मात्र या सार्वजनिक शोकसभेद्वारे आपण सर्वजण आपल्या भावना व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहू शकतो.
तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आले आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें