बडगुजर समाजात अमळनेर येथे प्रथमच भरल्या विधवा महिलांच्या साडी नारळाने ओटी!!

सोहळा हळदी कुंकूचा, प्रयत्न समाज प्रबोधनाचा.

अमळनेर:अमळनेर येथे दिनांक २२/०१/२०२३ रविवार रोजी क्षत्रिय बडगुजर समाज मंगल कार्यालयात. बडगुजर समाज मंडळ कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून सोहळा हळदी कुंकूचा, प्रयत्न समाज प्रबोधनाचा.हा कार्यक्रम म्हणजे हिंदु समाजाचे विधवा आणि परित्यक्ता माता, भगिनींना सर्वांगिण प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी समाजाच्या अनिष्ट जुन्या चालीरीतींना मोडून मुक्त हास्य आनंदी जीवनात एक छोटासा प्रकाश समर्पित सोहळाचे आयोजन आहे.आजच्या धकाधकीचे क्षणभंगुर जीवनात आधारहिन झालेल्या विधवा आणि परित्यक्ता माता भगिनींना वेगवेगळ्या नजरेने जिवन संग्राम त्रासातून सर्व संकटांना पाठीशी बांधून एकटेपणाचा लढा देणारे आणि मानसिक भावनानवर आघाताची ठोकलखात परिस्थितीशी झुंज देत निराश मनःस्थितीत आशा, आकांक्षा चिरुन जगावे लागते.अशा स्त्री शक्तीचा सन्मान करून समाज प्रवाहात मिसळून त्यांचा उत्साह आनंद द्विगुणित होऊन संघटन आणि उन्नती होण्यासाठी संपन्न झालेल्या सोहळ्याला महिलांनी भरपूर प्रमाणात, आवर्जून सहभागी होऊन कार्यालय प्रथमच भरगच्च भरले होते.विधवा माता भगिनींना हळदी कुंकू लावून मान्यवरांचे हस्ते साडी नारळ देऊन ओटी भरून वाण दिले व सौभाग्यवती स्त्रियांना हळदकुंकू सह वाण लावून सर्वांनी चहापाणी सह अल्पोपहाराचा स्वाद घेतला.अशा चिरस्मरणीय कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी ताईसाहेब सौ तिलोत्तमा रविंद्र पाटील ( मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर) श्रीमती ताईसाहेब राजश्री राजेश पाटील( सरपंच हिंगोणे), ताईसाहेब सौ.वसुंधरा दशरथ लांडगे( खा शि मंडळ विश्वस्त, अर्बन बँक संचालिका अमळनेर), ताईसाहेब सौ स्वप्ना विक्रांत पाटील ( भावी नगरसेविका), श्रीमती ताईसाहेब मंगला भास्कराव गिरनार,सौ.सिमाताई साहेबराव ( दादासाहेब )पवार , ताईसाहेब सौ रेखाताई रणजित पाटील ,.सौ.ताईसाहेब भावना वाघ( लक्ष्मी ज्वेलर्स), ताईसाहेब कल्पना किशोर बडगुजर, सौ.रत्ना मनोहर बडगुजर,सौ.शर्मिलाताई संजय बडगुजर( बडगुजर क्लासेस),सौ.ज्योतीताई समाधान बडगुजर,(प्रो. कृष्णा नोटबुक) तसेच कार्यक्रमाचे अत्यंत प्रतिभावशाली सुत्रसंचलन ताईसाहेब सौ रोहिणी दिनेश बडगुजर यांनी धडाकेबाज केले आणि प्रास्ताविक सौ रश्मी घनश्याम मांडळकर यांनी मजेदार मांडले.असाबडगुजर समाजाचे इतिहासातील लक्षवेधी प्रथमच सोहळा होय.
आलेल्या सर्वांचे आभार श्री प्रवीण पुंडलिक बडगुजर जगन्नाथबापु बडगुजर, घनश्याम रमेश मांडळकर सचिव, कैलास महादू बडगुजर खजिनदार, किरण शांताराम बडगुजर सर, अशोक राजधर बडगुजर सर, दिनेश सुरेश मांडळकर,शुभम खेमचंद बडगुजर, कुंदन प्रभाकर नंदवे, मनिष कन्हैयालाल बडगुजर यांनी मानले व समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात स्त्रीयांनी अशीच उपस्थिती द्यावी म्हणून आग्रहाचे आव्हान केले.

[democracy id="1"]