अमळनेर न प ची कर थकबाकीदारांवर कठोर कारवाई..14 दुकाने सिल तर 20 नागरिकांचे नळ कनेक्शन केले बंद…!

अमळनेर:नगर परिषदेला ३६ कोटी देणे आहे तसेच साडे सतरा कोटी जनतेकडून येणे असताना फक्त चार कोटी वसूल झाल्यामुळे
नगरपरिषदेतर्फे दुकाने सील आणि नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. नगरपालिकेची नागरिकांकडे असलेल्या मालमत्ता कर पाणीपट्टी कर व दुकान भाडेपोटी असलेल्या थकबाकीमुळे वसुलीची टक्केवारी कमी दिसत असून या कामी वेळोवेळी शासनाचे वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी सारखे आदेश येत आहेत.तसेच महावितरणचे गांधली, जळोद व कलाली येथील पाणीपुरवठा बाबतचे थकीत विजेचे बिल एकूण २० कोटी, सेवानिवृत्त कर्मचार्यांचे ग्रॅच्युटी, उपदान व वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कर्ज, शासनाच्या इतर रकमा देणे बाकी आहेत. तसेच नगरपरिषदेची वसुली वाढविण्यासाठी शासनाकडून सारखे येणारे आदेश व वसुलीची त्यांचे नळ कनेक्शन बंद करणे, जप्तीची कार्यवाही
करणे, व्यापारी संकुलास सील लावण्याचे काम, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाने व उपमुख्यअधिकारी संदीप गायकवाड, कर निरीक्षक जगदीश परमार यांच्या उपस्थितीत वसुली लिपिक महेश जोशी, सोमचंद संदानशिव, नितीन खैरनार, गणेश शिंगारे, राजेंद्र वानखेडे पार पाडली. यात २० जणांचे नळ कनेक्शन बंद
करण्यात आले. तर लाल बहादूर शास्त्री, तिरंगा चौक स्वामी विवेकानंद शॉपिंग, कुंटे रोड आदी ठिकाणची १४ दुकाने सील केली आहेत.
नागरिकांनी वेळीच आपल्याकडे थकीत व चालू असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व दुकान भाडे त्वरित भरून नगरपरिषदेस सहकार्य करून जप्ती, कनेक्शन बंद करण्यासारखी कटू कारवाई टाळून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी
प्रशांत सरोदे यांनी केले आहे.