वर्ष रेशन फ्री मिळणार पहा तुम्हाला किती मिळेल

1 Year Free Ration Yojana Scheme : तुम्ही ऐकलेली माहिती खरी आहे. मोदी सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत पात्र असलेल्या रेशन कार्ड धारकांना पुढील एका वर्षासाठी म्हणजेच एक जानेवारी 2023 पासून मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर तुम्हाला या लेखांमध्ये या निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

One year free ration yojana 2023
पूर्ण एक वर्ष रेशन मोफत मिळेल | Free Ration Yojana For 2023
पूर्ण देशासाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सर्व 81,35 कोटी लाभार्थ्यांना पुढील एका वर्षासाठी म्हणजे एक जानेवारी 2023 पासून मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता पूर्ण भारतवासीयांना पुढील 2023 मध्ये पूर्ण एका वर्षासाठी रेशन मोफत मिळणार आहे. आणि याच्यात हे सुद्धा सांगितले आहे की एका कुटुंबाला किती धान्य मिळेल त्याचबरोबर प्रति व्यक्ती किती धान्य मिळेल अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. (Free ration yojana 2023)

तुम्हाला किती रेशन मिळते पहा | Free Ration Yojana Maharashtra
फ्री रेशन योजनेअंतर्गत घेतलेल्या निर्णयानुसार पुढील एका वर्षासाठी मोफत धान्य मिळणार आहे. एका कुटुंबातील प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे. तर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिक कुटुंब 35 किलो धान्य एका वर्षासाठी मोफत दिले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानित अन्नधान्य तीन रुपये प्रति किलो तांदूळ, दोन रुपये प्रति किलो गहू तर एक रुपये प्रति किलो भरडधान्य लाभार्थ्यांना आतापर्यंत वितरित केले गेले आहे. पण यापुढे आता रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि नेतृत्वाखाली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत 28 महिने मोफत धान्य वितरण आतापर्यंत करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय सर्व देशवासीयांना एक वर्ष रेशन मोफत
केंद्र सरकार एनएफएससी अंतर्गत या आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अनुदानापोटी दोन लाख कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करणार आहे या निर्णयामुळे गरिबांचा आर्थिक ताण कमी होणार आहे याचा दिलासा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिला असून मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना या गोष्टी सांगितल्या. सरकारचा आतापर्यंतचा मोफत धान्य योजना हा ऐतिहासिक निर्णय असून कल्याणकारी योजनांच्या लाभार्थी गरिबांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशीलता दर्शवणारा हा निर्णय आहे.

[democracy id="1"]