पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत जळगाव पोलीस दलाची चमकदार कामगिरी.

अंमळनेर:महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये पोलीस जलतरण तलावाचे खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या दिनांक १ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे संपन्न झालेल्या स्पर्धांमध्ये मॉडर्न पेंटाथलॉन, ट्रायथलॉन, वॉटर पोलो व स्विमिंग या स्पर्धांमध्ये जळगाव पोलीस जलतरण तलावाचे स्पर्धकांची निवड झाली होती. त्यांनी या राज्य राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून पुढील प्रमाणे विजय मिळवून पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटू यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मेडल संपादन केले.
*मॉडर्न पेटयथलॉन
वैयक्तिक ट्रायथले क्रीडा प्रकारात जळगाव जिल्हा पुरुष संघ कांस्य पदक मिळविले संघात विजयी खेळाडु पुढीलप्रमाणे ओम रवींद्र चौधरी, हर्षवर्धन लिलाधर महाजन,तलाहा सिद्दिकी *तसेच मॉडर्न पेटयथलॉन क्रीडा प्रकारात जळगाव जिल्ह्याला गुणांचा आधारे महाराष्ट्र राज्यतुन चौथ्या स्थानी राहिला.
*वॉटर पोलो
यात जळगाव जिल्हा संघ सहभागी होत सर्व लिंक स्पर्धेत 17 गोल करीत महाराष्ट्र राज्य तुन चौथ्या स्थानी राहिला तसेच अमेय नगरकर पोलीस जलतरण तलाव जळगाव याने पुणे जिल्हातुन प्रतिनिधी करीत गोल्ड मेडल मिळविलेले आहे.

  • ट्रायथलॉन
    यात मिक्स रिले ट्रायथलॉन प्रकरात भारत कुथे हयाने कांस्य पदक संपादन केले वैयक्तिक ट्रायथलॉन महिला मध्ये धनश्री जाधव हि सातव्या स्थानी राहिली
    वरील स्पर्धेकरिता तांत्रिक पंच म्हणून कमलेश नगरकर, जयंत चौधरी, सुरज दायमा, यांनी काम पाहिले विजयी खेळाडुचे पोलीस अधीक्षक जळगाव श्री एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री संदीप गावित, पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ सुनंदा पाटील यांनी सत्कार व कौतुक करून अभिनंदन केले