मारवड, अमळनेर (योगेश पाने ): दि.16/01/2023 – रोजी मारवड येथील एस. एच. मुंदडे हायस्कूल येथे मोठ्या जल्लोषात व उत्साहात शालेय स्पर्धेचे आयोजन व सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री एल. जे. चौधरी, पर्यवेक्षक श्री. जी. ए. साळुंखे सर श्री ए. बी. शिंदे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सविस्तर वृत असे की, मारवड येथील सुरजमल हिरालाल मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ.फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे इयत्ता 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर असलेल्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन आज रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एल. जे. चौधरी सर, तथा पर्यवेक्षक श्री जी. ए. साळुंखे सर, श्री.ए बी शिंदे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शालेय स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासोबत त्यांचा शारीरिक विकास हा महत्वाचा असतो व हा विकास होण्यासाठी विद्यार्थ्याना शालेय जीवनात शारीरिक खेळ आवश्यक असतात. शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाने प्रत्येक शाळेत अशा शालेय स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या संघांना व वैयक्तिररित्या विद्यार्थ्यांना शालेय कार्यक्रमात बक्षिसे वाटप करून त्यांना प्रोत्साहनही दिले जाते. अशाच शालेय स्पर्धेचे आयोजन हे मारवड येथील एस.एच.मुंदडे हायस्कूल येथे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने करण्यात आले. या उपक्रमातंर्गत आज विद्यार्थ्यांचे कबड्डी तथा खो-खो या खेळाचे सामने आयोजित करण्यात आले. कबड्डी व खो – खो सामन्यांसाठी पंच म्हणून श्री. निलेशकुमार साळुंखे सर, श्री प्रितम सोनवणे सर, श्री योगेश पाने सर यांनी कामकाम बघीतले. या सामन्याचे गुणलेखन हे शाळेतील शिक्षीका श्रीमती जे.डी.साळुंखे मॅडम, श्रीमती एस.व्ही. आगळे मॅडम यांनी केले. तर सामन्यासाठी वेळेचे अचूक असे नियोजन हे श्री.सचिन साळुंखे सर व श्री.सुरेश वाडीले सर यांनी केले.
विद्यार्थ्यांनी अत्यंत चुरसीच्या व अटीतटीच्या झालेल्या सामन्यामध्ये सांघीक खेळ करत संघभावनेने उत्कृष्ट खेळाचे दर्शन या सामन्यामध्ये घडवले. शालेय विद्यार्थ्यांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थी खेळाडूना सामना जिंकण्यासाठी प्रोत्साहीत केले. एकदंरीत आज झालेले सर्व शालेय खेळ हे पंच म्हणून कार्यरत असलेले शिक्षक श्री निलेशकुमार साळुंखे, श्री प्रितम सोनवणे, श्री योगेश पाने, श्री.जे.व्ही.पाटील यांनी उत्कृष्टपणे व अचूक अशा निर्णयाने दिले त्यामुळे विद्यार्थी खेळाडू यांनी सर्व पंचाचे आभार व्यक्त केले. या खेळादरम्यान विद्यार्थ्याना कोणतीही इजा होवू नये म्हणूनही सर्व शिक्षकवृंदानी काळजी घेतली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात सदर स्पर्धा ह्या पार पडल्या. तसेच या शालेय स्पर्धासाठी समालोचक तथा शालेय शिस्त व बैठक व्यवस्थेसाठी सर्व ज्येष्ठ शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योग्य ते मार्गदर्शन यावेळी मिळाले.