अमळनेर : येथील खा शि मंडळाच्या जी एस हायस्कूल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पराग धनंजय कापडणीस या विद्यार्थ्याने राजमाता जिजाऊ यांची भूमिका तर या प्रणव विजय पाटील या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारून मनोगत व्यक्त केले.प्रमुख वक्ते अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना संस्कार रुजवणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ तर कुशल पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना बालवयात योग्य संस्कार झाले तर उत्तम चरित्र आपले घडत असते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी एच ठाकुर,कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उपमुख्याध्यापक आर एल माळी,पर्यवेक्षक एस बी निकम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.