राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

अमळनेरचा उमेदवार ठरणार पुण्यात

इझनभर उमेदवार इच्छुक तिकिटाच्या शर्यतीत

अमळनेर : विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती आज सोमवारी (दि. ७) रोजी पुणे येथे दुपार पासून होत आहेत. डझनवर इच्छकांनी जय्यत तयारी सुरू केलेली असून, कोणाच्या नशिबात तिकिटाची लॉटरी लागते, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे.

अमळनेर मतदारसंघ हा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडे जाणार असल्याचे समजल्यामुळे या पक्षाकड़े उमेदवारांची रीघ लागली आहे. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मतदारसंघातील सर्वे व जनतेचा कौल लक्षात घेऊन उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पक्षाने आतापर्यत दोन सर्वे केलेले असून, या सर्वेतून क्रमवारी निश्चित झालेली आहे. आज सर्व इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्या कोअर कमिटीच्या ( शरद चंद्रजीपवार साहेब) माध्यमातून पुणे निसर्ग मार्केट यार्ड गुलटेकडी येथे घेतल्या जात असून, यावेळी कोणाही इच्छुक उमेदवाराला शक्तिप्रदर्शन न करण्याचा सज्जड़ दम दिला गेला होता . फक्त उमेदवारानेच मुलाखतीला हजर राहायचे आहे. असे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील शरदचंद्र पवार गटाचे इच्छुक उमेदवार आपापले कार्य कर्तव्य सिद्ध करण्यासाठी शरदचंद्र पवार साहेब यांच्यासमोर आपापल्या मुलाखती दिल्या असून त्यात अमळनेर येथील इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील प्रदेश सरचिटणीस, डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार ,उमेश पाटील ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष,प्रा.अशोक पवार, रीता बाविस्कर ,श्याम पाटील शहराध्यक्ष, प्रशांत निकम सचिन दादा तालुका अध्यक्ष, संजय पुणाजी पाटील, व अजून बरेच इच्छुक उमेदवार आलेले असून शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर मुलाखती देऊन आपले विधानसभेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजर झालेले आहेत.

माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांची मुलाखतीस गैरहजरी

परंतु अमळनेरचे माजी आमदार कृ्षिभूषण साहेबराव पाटील ज्यांनी काही दिवसांपासून मतदार संघात भेटी गाठी सुरू करत, राष्ट्र्वादी शरद पवार पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केला होता तेच साहेबराव पाटलांनी आज पुणे येथे झालेल्या मुलाखतीस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर मुलाखतीस गैरहजेरी दर्शवली.

तालुक्यातील हिंगोणे  येथील दिव्या ताई पाटील यांनी दिली राष्ट्रवादी शरद पवार पक्षात उमेदवारीसाठी मुलाखत

अमळनेर तालुक्यातील हिंगोणे गावातील  दिव्या ताई पाटील यांनी देखील इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला होता त्यांनी आज दिनांक ७ रोजी शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर मुलाखत दिली आहे. त्या  मंत्री पाटीलांच्या भावजाई असल्याचे समजते हिंगोणे गाव हे माझे सासर असून पक्षाने मला उमेदवारी दिली तर 20 टक्के राजकारण 80टक्के समाजकारण करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]