चाळीसगाव ( प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येते की,दि.२६ सप्टेंबर २०२४ पासून मानधन वाढीचा जिआर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काढावा या मागणीसह पेन्शन आणि ग्रॅच्युटी लागू करावी. म्हणून आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. परंतु शासनाने चार दिवस उलटूनही सदर आंदोलनाची दखल घेतली नाही.म्हणुन त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दि.२९ सप्टेंबर रोजी चाळीसगांव तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधींनी संघटेनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांना त्यांच्या येथील निवासस्थानी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले. असे असले तरी जोपर्यंत मानधन वाढीचा निर्णय होत नाही तो पर्यंत आझाद मैदान मुंबई येथील धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी केला आहे. निवेदन देते वेळी श्रीमती संगिता पाटील,आशा पाटील, सुनंदा नेरकर,शारदा पाटील, स्वाती पाटील,मिना पाटील, नथाबाई अहिरे,शालिनी चव्हाण, संगिता सानप,रमाबाई
शिंपी,संगीता धिवरे,रेखा माळी यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.