अमळनेर : आमळनेरच्या तरुणावर झालेल्या चाकूहल्लातील मुख्य आरोपी महेद्र शालिग्राम बोरसे हा अद्यापही फरार असून या प्रकरणात महेंद्र पाटील याचा लहान भाऊ विनोद शालिग्राम बोरसे (पोलिस पाटील, सात्री. ता. अमळनेर) याच्यावरही पोलिस तपासात आरोप निष্पन्न झाला असून त्याच्यावरही कलम १०९(१) ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला असून तो देखील फरार आहे. मात्र या प्रकरणातील हल्लेखोर सागर ज्ञानेश्वर खैरनार, विजय रमेश देवरे आणि आकाश उर्फ राघव नंद जाधव या तीन आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी किली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागील एका भांडणाच्या कारणावरून गोपाल उर्फ उमाकांत सुरेश पारटील (रा. सुंदरपट्टी, ता. अमळेनर) हा तरुण १७ रोजी जळगाव येथुन न्यायालयीन कोठडीतून जामीनावर सुटका होऊन अमळनेरकड़े मोटारसायकीलवरुन येत असताना मूसळी गावाच्या पूढे सुमारे १ किमी अंतरावर शिवाजीराव
पाटील पोलीटेक्नीक कॉलेज समोर रस्त्यावर असलेल्या गतीरोधकाजवळ अगोदरच उभे असलेल्या सागर ज्ञानेश्वर खैरनार, विजय रमेश देवरे अणि आकाश उर्फ राघव नंद जाधव या तिघांनी गोपालवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू सारख्या हत्याराने डोक्यावर, पाठीवर व कानावर हल्ला केला. त्यात गोपाल हा गंभीर
जखमी झाला होता, त्याला तात्काळ् उपचारार्थ धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. अद्यापही त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी गोपालचे मामा किशोर दिलभर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १७ रोजी धरणगाव पोलिसांत महेंद शालिग्राम बोरसे व अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या तपासात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ३१ ऑगस्ट रोजी सागर ज्ञानेश्वर खैरनार, विजय रमेश देवरे आणि आकाश उर्फ राघव नंद जाधव या तिघांना अटक केली. पोलिसानी अधिक तपास केला असता महेंद्र बोरसे याचा लहान भाऊ विनोट बोरसे हा देखील त्या चाकूहल्ल्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार विनोद बोरसे याच्यावरदेखील धरणगाव पोलिसात कलम १०९(१) ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तोदेखील फरार झाला असून पोलिस दोन्ही भावाच्या मागावर आहेत. विनोद बोरसे हा सात्री गावाचा पोलिस पाटील असून गावातील का्यदा व सुव्यवस्था अबादित राखण्याची जबाबदारी त्याच्या हाती असून शिवाय शासेनायां महत्वाचा समजला जाणारा दुवा असूनही त्याने या गुन्ह्यात. हस्तक्षेप करुन एकप्रकारे त्याने कार्यदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. सात्री गाव अगोदरच पूनर्वसनासाठी शासनदरबारी पाठ्पुरावा करत आहे. शिवाय सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बोरी नदीला पूर आल्यास सात्री गावाचा संपर्क तालुक्याशी तुटतो. त्यात गावाचा पोलिस पाटील विनोद बोरसे हा फरार आहे.
अशाप्रसंगी गावात कायदा व सुूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती. गावकऱ्यांनी व्यक्त
केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करित आहे.