चोपडा ( प्रयिनिधी) : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कर्तव्य बजावत असताना चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर सोमवारी त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव बुधवारी चोपडा येथे राहत्या घरी पोहचल्यानंतर दुपारी पार्थिवावर शासकीय इतमामात अत्यसस्कार करण्यात आले. हजारो तालुकावासीयांनी त्यांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. पाच वर्षीय सिंथू व तीन वर्षीय समर्थ यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.
सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर वय ४२) हे त्रिुपुरा येथे चकमकीत शहीद झाले.
दरम्यान, त्यांचे पार्थिव इंदूर येथून बीएसएफच्या वाहनाने बुधवारी सकाळी चोपड्यात आणण्यात आले. त्यांचा राहत्या घरापासून साईबाबा कॉलनीपासून जुन्या घराच्या मारगें पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनातून रामपुरा येथील नगरपालिकेच्या अमरधाम येथे आणण्यात आले. ‘अमर रहे, अमर रहे, शहीद अरुण बडगुजर
अमर रहे’ अशा घोषणांनी पूर्ण चोपडा शहर दुमदुमले होते.