अमळनेर : तालुक्यातील हिंगोणे बु. येथील एकाचा बोरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यास रात्री अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बु. येथील अरुण संभु पाटील हा व्यक्तीचा बोरी नदीत बुडून संध्याकाळी ६:३० वाजता बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हिंगोणे गावातील बोरी नदीत हा व्यक्ती बुडाला असल्याचे गावातील लोकांना समजले, तेव्हा ते बचावासाठी गेले मात्र तोवर सदर व्यक्ती हा अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर वाहून गेला होता. तेव्हा त्यास मुडी गावाजवळ नदीतून बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या बाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढीव तपास मारवड पोलीस करीत आहेत.