डाॅ.अनिल शिंदे सभापती, अशोक पाटील तसेच के. डी. पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान!!
अमळनेर
:शहर हे अनेक लोकांच्या कर्तृत्वाने ओळखले जाते. पू सखाराम महाराज तसेच साने गुरुजी व लिलाताई पाटील यांच्या क्रान्तिकारक कृतीने प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा नुकताच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण ह्या सभागृहात संवादयात्रा सांगता समारोह पार पडला. पत्रकाराची व्यथा शासन दरबारी त्यात मांडण्यात आली. पाचोरा येथे मोठ्या संख्येने अधिवेशन पार पडले त्यात पत्रकारांसाठी विमा काढण्यात आला तसेच ट्रॅकशुट वाटप करण्यात आले. याप्रसंगी विविध मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले. त्यात अमळनेर येथील नामांकित सर्जन डाॅ.अनिल शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला. डाॅ.अनिल शिंदे हे वैद्यकीय क्षेत्रात एक नामांकित नाव आहे. त्यांना सामाजिक पार्श्वभूमी आहे. काँग्रेस पार्टीत त्यांनी विविध पदे भूषविली आहे. आपल्या निडर वृतीने जोखिम पत्करून विविध शस्त्रक्रिया केलेल्या आहे. प्रताप विदयालयात खान्देश मंडळात पदाधिकारी आहेत. पदावर येताच विविध पध्दतीने गुणवत्तेवर आधारित प्रयोग त्यांनी केलेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती जी जिल्ह्यातील बाजार समितीत उत्तम कामगीरी करणारी समिती आहे. मा. अशोक आधार पाटील यांना ही राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.अशोक आधार पाटील यांनी शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर आणल्या. शेतीवर विविध प्रयोग करण्याचे शेतकऱ्यांना सुचविले. बाजार समितीत काटेकोर कारभार करुन शेतकऱ्यांना अनेक सुविधा पुरविल्या आहेत. अनेक डावपेच, आराखडे माहित तिसरे व्यक्तिमत्त्व ते ही अमळनेर येथील धनदाई माता एज्युकेशन चे सर्वेसर्वा के. डी. पाटील यांना देण्यात आला. शांत, निगर्वी स्वभाव, संयमी व्यक्तिमत्त्व यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. हे तिन्ही
दिग्गज लोक अमळनेर नगरीचे आयडॉल आहेत. यांनी आपापल्या क्षेत्रात नाव कमविले आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे.