महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचे ग्रामस्थांना आश्वासन
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांकडे आजी माजी लोकप्रतिनीधींनी दुर्लक्ष केल्याचे विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. मात्र निवडून आल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी प्रचारादरम्यान ग्रामस्थांना दिले.
गेल्या दहा वर्षांत लोकप्रतिनिधींना फक्त मते मागण्यापुरता आमची आठवण येते, अशी भावना ह्या ४२ खेड्यातील ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. या खेड्यांतील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून डागडुजीची ही तसदी न घेतल्याने ग्रामस्थांचा मोठा रोष व्यक्त होत आहे. मोजक्या गावात निधी देऊन इतर गावातील ग्रामस्थांची केवळ आश्र्वासानांवर बोळवण केली जात असल्याचे ग्रामस्थांनी डॉ. शिंदे यांना प्रचारादरम्यान बोलून दाखवले. यावेळी मतदारसंघात पुन्हा परिवर्तन घडवून मला सेवेची संधी दिल्यास या ४२ खेड्यातील मूलभूत समस्या सोडवून मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासाचा अनुशेष भरून काढेल असे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचारादरम्यान पारोळा तालुक्यातील ह्या ४२ गावात डॉ. शिंदे यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.