डॉ. अनिल शिंदेनी उपचार करून जीवदान दिलेले रुग्ण प्रचारादरम्यान भेटून व्यक्त करतायेत ऋण

तीन दशकांपासून तालुक्याची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची यंदा करणार मतांद्वारे परतफेड

अमळनेर: महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान खेडोपाडी डॉ. अनिल शिंदेनी उपचार करून जीवदान दिलेले रुग्ण प्रचारादरम्यान भेटून ऋण व्यक्त करून यंदा मतपेटीतून डॉक्टरांच्या उपकाराची परतफेड करणार असल्याची भावना बोलून दाखवत आहेत.
डॉ. अनिल गेल्या ३० वर्षापासून तालुक्यातील आरोग्य दूत म्हणून लोकांची सेवा करताना नेहमीच दिसतात. ह्या तीन दशकांत अनेक चिंताजनक प्रकृती असलेल्या व मरणाच्या काठावर असलेल्या अनेकांना डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. अनेक विषबाधा झालेल्या, व गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना डॉ. शिंदे यांनी मरणाच्या दारातून परत आणले आहेत. यंदा डॉ. अनिल शिंदे यांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली असून ते प्रचारासाठी मतदारसंघात फिरत आहेत. यावेळी खेडोपाडी त्यांनी ज्या-ज्या रुग्णांना त्यांनी आजारातून मुक्त करून जीवनदान अर्पण केले आहेत. अशा रुग्णांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी होताना दिसतायेत. यावेळी सदर रुग्ण व त्यांचे नातलग कृतज्ञता व्यक्त करून यंदा डॉ. अनिल शिंदे यांनाच निवडून देण्याच्या निर्धार व्यक्त करत आहेत. डॉ. शिंदेच्या प्रचार दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर परिश्रम करताना दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]