अमळनेर :येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालया च्या अँटी रॅगिंग अँड सेक्सुअल हरेसमेंट समिती व तालुका विधी सेवा समिती अमळनेर, वकील संघ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रम सानेगुरुजी सभागृहात घेण्यात आला. याप्रसंगी एडवोकेट राजेंद्र व्ही. निकम( सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी पोक्सो ऍक्ट अर्थात बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम विषयी माहिती दिली. एडवोकेट यज्ञेश्वर पी. पाटील (सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ कायद्याविषयी माहिती सांगितली. एडवोकेट जगदीश यु. बडगुजर (सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी रॅगिंग विरोधी कायदा व वाहतुकीचे नियम बद्दल माहिती दिली. याप्रसंगी मंचावर एडवोकेट अविनाश व्ही. खैरनार, एडवोकेट किशोर डी. पाटील, खानदेश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष आदरणीय माधुरीताई पाटील, सुनील पाटील (वरिष्ठ सहाय्यक,तालुका विधी सेवा समिती, अमळनेर) त्याचप्रमाणे संस्थेचे सहसचिव प्रा.डॉ. धीरज वैष्णव आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव व आदरणीय प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन यांनी भूषविले . समितीच्या सदस्या डॉ. वंदना भामरे, डॉ. प्रियंका पाटील, श्रीमती एस व्ही. महाले, विद्यार्थिनी प्रतिनिधी अंकिता सावंत, प्रा. पुष्पा पाटील, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. वृषाली महाजन, प्रा.हेमलता सूर्यवंशी प्रा. मनीषा मोरे तसेच सभागृहात मोठ्या संख्येने प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या समन्वयक व महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.डॉ. कल्पना पाटील आणि आभार समितीच्या सदस्य व गणित विभाग प्रमुख प्रा.डॉ. नलिनी पाटील यांनी मानले.