तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौक येथे पाडळसरे धरणासाठी लक्षवेधी आंदोलन

निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौक येथे लक्षवेधी आंदोलन

आंदोलनकर्ते तिलोत्तमा पाटील व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाच्या कार्यालयातबसवूनठेवराष्ट्रवादीकाँग्रेस पक्षकार्यालयाच्याभोवतीलावलापोलीस बंदोबस्त 

जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी अमळनेरच्या तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौक येथे लक्षवेधी आंदोलन निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण गेल्या दोन दशकांपासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रखडलेले असून अमळनेर सह तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व उद्योग व्यवसायासाठी संजीवनी ठरणार आहे सदर धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा म्हणून सातत्याने पाडळसरे धरण जन आंदोलन समिती पाठपुरावा करीत असताना त्यांना जळगाव येथे येण्यास पोलिसांनी मज्जाव घातला असला तरी पंतप्रधानांचे लक्ष तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्पाकडे वेधण्यासाठी यांनी अमळनेर तालुक्यातील आपल्या महिला कार्यकर्त्यांसह जळगावच्या आकाशवाणी चौकात धरण झालेच पाहिजे, पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिद्धांत योजनेत केलाच पाहिजे! असे विविध घोषणा फलक हातात घेऊन जोरदार निदर्शनं करीत आंदोलन केले. पोलीस प्रशासनाला कुठली सूचना नसल्याने अनपेक्षित घडलेल्या या आंदोलनाने महिला नेत्या सौ.तिलात्तमा पाटील व सहकाऱ्यांनी या प्रश्नाला जळगावच्या पंतप्रधानाच्या दौऱ्यात वाचा फोडली आहे. दरम्यान सदर आंदोलन सुरू असतानाच पोलीस तातडीने आकाशवाणी चौकात पोहोचले व सर्व आंदोलनकर्त्याना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बसवून ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या भोवती पोलीस बंदोबस्त लावलेला होता.

प्रसंगी आंदोलनंकर्ते वाल्मीक पाटील, मंगला पाटील, उमेश पाटील, संजय चव्हाण, अरुण शिंदे सर, कविता पवार कृष्णा पाटील, शरद पाटील, रविंद्र पाटील, हिरालाल पाटील, शुभाष पाटील, मनोज पाटील आदी लोक उपस्थित होते. त्यामुळे या विषयावर जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार व जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री यांचे सह पंतप्रधान काय बोलतात व कोणती भूमिका म्हणतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. आंदोलकांजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन असून सौ.तिलोत्तमा पाटील यांच्या सह आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षरीचे सदरचे निवेदन पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान यांचे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आंदोलकांचा दिसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]