सुप्रसिद्ध युट्युबर राजश्री बडगुजर यांनी एक लाख सबस्क्रायबर चा टप्पा यशस्वीपणे केला पार

अमळनेर :गेल्या 24 वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध युट्युबर सौ राजश्री सुदाम बडगुजर यांनी आपल्या राजश्री बडगुजर या यूट्यूब चैनल वर, आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या संकल्पना राबविल्यात. समाज उपयोगी व समाजास योग्य दिशा दर्शवणारे ,संस्कृती जोपासणारे तसेच महाराष्ट्राची वारी संस्कृती ही जपणारे अनेक कार्यक्रम आपल्या युट्युब मार्फत प्रसारीत करीत असतात व आहेत. अनेक प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती तसेच मरावे परी कीर्ती रूपे उरावे ,विवाह जुळवितांना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना ऑनलाइन मुलाखती मार्फत समाज प्रबोधनही केले. पुण्यातील वधू _वर मेळावा संदर्भात त्यांनी आपल्या युट्युब व्हिडिओ च्या माध्यमातून वधू-वरांनी परिचय मेळाव्यात सामील का व्हावे? त्याची गरज आणि महत्त्व? स्टेजवर स्वतःला प्रेझेंट कसे करायचे ? का करायचे? हे विचार सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवले. तरुणाईचा त्या मेळाव्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला , आपले फीडबॅकही चैनल वर नोंदवले.
कोरोना काळापासून सतत समाजासाठी काहीतरी सक्रिय करत असलेल्या राजश्री बडगुजर या यूट्यूब चैनला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या तसेच कुलस्वामिनी श्री चामुंडा माता यांच्या आशीर्वादाने व व्हिवर्स , सबस्क्राईब यांच्या पाठिंबामुळे, प्रत्येक युट्युबर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो, स्वप्नवत वाटावा असा 100k म्हणजेच एक लाख सबस्क्रायबर चा महत्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला. तसेच 35 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी या चॅनलला पंसती दिलेले आहे. त्यामागील त्यांची मेहनत ,चिकाटी, धडपड स्पष्ट दिसत आहे . या अलौकिक यशाबद्दल राजश्री ताईंचे अमळनेर बडगुजर समज  पंचमंडळ तर्फे खूप खूप अभिनंदन व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले त्यांच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणारे त्यांचे पती प्राध्यापक सुदाम हिम्मतराव बडगुजर यांचे तसेच संपूर्ण कुटुंबाचे ही आभार. पुढील वाटचालीस आमच्या चामुंडा माता मंदिर निर्माण  समिती तर्फे शुभेच्छा.💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *