अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन दोन वेळेस बलात्कार केल्याने अपहरणाच्या गुन्ह्यात वाढली कलमे
अमळनेर : बुधववारी जवखेडा येथील 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटनेस व गुन्ह्यास 24 तासही उलटत नाही तोवर गुरुवारी पुन्हा अमळनेर पोलिसात बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी पळवून नेली होती. या बाबत अमळनेर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुरुवारी या दोघांना अमळनेर पोलिसांनी शोधून आणले असता, त्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानुसार बलात्कार व पोस्को सारख्या कलमांची वाढ करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील एका मुलाने त्याच भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते, या बाबत अमळनेर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित मुलीचा व मुलाचा अमळनेर पोलीस कसून तपास करीत होती. शेवटी गुरुवारी अमळनेर पोलिसांनी दोघांना शोधून आणले असता, मुलीची वैद्यकीय तपासणी व तिने दिलेल्या जबाबावरून अपहरणाच्या गुन्ह्यात कलम 64 (1) नुसार बलात्कार व पोस्को कायद्याची कलमे 4, 5, (एल) , 8, 12 ही वाढवण्यात आली आहेत.
दरम्यान सदर पिढीत अल्पवयीन मुलीस जळगाव महिला दक्षता समिती कडे पाठवण्यात आले आहे.