अमळनेर: प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागातील राजश्री ज्ञानेश्वर देशमुख या विदयार्थीनीचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड झाली. ही विदयार्थीनी जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयकडुन घेण्यात येणारी परिक्षा उत्तीर्ण झाली. ही परिक्षा राज्यशासनाच्या गृहमंत्रालया अंतर्गत पोलिस अधीक्षकांच्या निगराणीखाली घेतली जाते . या यशाबद्दल राजश्री ज्ञानेश्वर देशमुख यांचे प्राचार्य डॉ . अरुण जैन , खा शि मंडळाचे संचालक हरिअण्णा वाणी तसेच सर्व संचालक मंडळ सहसचिव प्रा. धिरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ . अमित पाटील ,डॉ कल्पना पाटील , डॉ. तूंटे , प्रा .पराग पाटील, डॉ. विजय मांटे , डॉ. जे बी पटवर्धन, डॉ योगेश तोरवणे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील ,डॉ. वंदना पाटील ,प्रा. रोहन गायकवाड आदींचे तिला मार्गदर्शन लाभले. विभागातील यापूर्वी देखील 2 विदयार्थ्यांचे सतिश पाटील व सुवर्णा पाटील यांचे PSI पदी नियुक्ती झालेली आहे . यामुळे महाविदयालय व विद्यापीठ स्तरावरून विदयार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.