शाळेत गाव समाज येणे गरजेचे.
अमळनेर: दिनांक 28/07/2024 वार रविवार रोजी शैक्षणिक सप्ताहचा शेवटचा दिवस समारोप.आमची आश्रम शाळा सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा चिमणपूरी-पिंपळे ता.अमळनेर जि.जळगांव येथे शिक्षण सप्ताह 16जुलै 2024च्या परिपत्रकानुसार भारत सरकारच्या विद्यांजली पोर्टल नुसार कार्यक्रम घेण्यात आले.
आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. केंद्रप्रमुख श्री.गोकुळ आनंदा पाटील आजच्या सभेचे अध्यक्ष प्राचार्य श्री उदय आत्माराम पाटील.प्रास्ताविक श्री सतिष कांगणे यांनी करतांना सांगितल आपण सात दिवसांपासून आपल्या सुप्त गुणांना संधी उपलब्ध झाली.
आजच्या शेवट समारोपाच्यासाठी आपल्या तालुक्यातील प्रमुख पाहूणे लाभले आहेत. आबासाहेब श्री.गोकुळ पाटील मा.केंद्रप्रमुख ता.अमळनेर जि.जळगांव यांनी मार्गदर्शनपर बोलतांना आपण आजपर्यंत स्वरांजली,काव्यांजली,गीतांजली,सुमनांजली, आदरांजली आणि श्रध्दांजली ऐकलं आहे.पण आता आपणास “विद्यांजली” हे नाव व पोर्टल सात दिवसांपासून माहीत झाले.यामुळे शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली.यात शिक्षण प्रेमी सेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे अनुभव कथनचा शेवटचा दिवस यासाठी आपणास आपला सर्वांगीण विकासासाठी दररोज वेगवेगळे प्रकारचे उत्कृष्ट ज्ञानाचे शैक्षणिक भोजनाची मेजवानीच मेंदूस मिळाली.विद्यांजली हे संस्कृत शब्द आहे.विद्या म्हणजेच ज्ञान आणि अंजली म्हणजेच दोन्ही हातांनी अर्पण करणे.सर्वप्रथम मी सर्व पवित्र महान कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना अभिनंदन करतो.कारण ज्ञानदानाचे महान कार्य आपल्याहातून घडत आहे.या परिपत्रकानुसार शाळेच्या वेळेनंतर आधी स्वयंसेवकांनी स्वखुशीने विनामूल्य आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा.अनुभवी व्यक्तीच्या सहाय्याने स्वयंसेवक नेमणूक करुन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आनंददायी,नाविन्यपूर्ण, विद्यार्थीकेंद्रित, ज्ञानरचनावादावर, कृतीयुक्त अध्यापन, विद्यार्थीसहभाग, हसतखेळत यामुळे शैक्षणिक प्रगती होईल.तसेच लोकसहभागातून शालेय भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रेरणासभा,घेऊन दाते यांच्या समोर शाळेतील भौतिक गरजा उपाययोजना करणे,आम्ही शैक्षणिक उठाव, गावसहभाग, प्रौढशिक्षण,बालआनंद मेळावे,सगुण शाळा,माझी शाळा सुंदर शाळा,ABL शाळा,ISO शाळा ,माझ्या स्वप्नातील शाळा,डिजिटल शाळा,प्रोजेक्ट शाळा,फरशी रेखाटन ज्ञानरचनावादी शाळा ,बोलकी शाळा,बोलके विद्यार्थी इ.उपक्रम यशस्वीपणे राबवले परंतु यात टिम वर्क फार महत्त्वाचं असतं.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलतांना म्हणाले ध्येय हे लाकडासारखे नसावे ते दगडासारखे असावे.1ते 4 वर्ग ही पायाभरणी असते.5 ते 9वी पर्यंत हा मशागतीचा काळ असतो.10वी टर्निंग पाँईंट 11वी 12वी हा तुमच्या करियरचा सुवर्णकाळ असतो.सोळावे वरीस धोक्याचे नसून मोक्याचं आहे.16ते 22वर्षाचा काळ फारच महत्वाचा टप्प्या आहे.यात आईवडीलांचं सुक्ष्म निरीक्षण असावं.आई-वडीलांनी मोठी स्वप्न मुलांना दाखवावीत.आपल्या क्षमतांचा उपयोग 5/10%च करतो पुर्ण उपयोग करा.परिस्थिती आड आणू नये.परिस्थितीला शरण न जाता मात करा.यशस्वीतेसाठी पाच गोष्टी ध्येय निश्चित करा,दृढ आत्मविश्वास, अहवानांना दोन हात करा,न्यूनगंड नष्ट करा,स्वतःची ओळख करा.जिद्द, चिकाटी,मेहनत, सातत्य, स्वप्न पाहणे,अभ्यासाच्या पध्दती,अभ्यासाची वेळ इ.वर सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बापूसाहेब श्री उदय पाटील विद्यार्थ्याचे लक्षणं ज्ञानाची भूक हवी,आज्ञाधारक असावा,नम्र असावा,प्रश्न पडणारा,चिकित्सक, मन,बुध्दी,चित्त,कशी असावी उदाहरणांसहीत स्पष्टीकरण करून सांगितलं आणि आईवडीलांच्या परिस्थितीची जाणीव असावी. 4 H सक्षम करणे Head,Hand,Hart,Helth.आणि आज शैक्षणिक सप्ताहचा सातवा दिवस.अध्यात्मिक सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आपण काल्याच्या कीर्तनाला नामांकित महाराज आणतो. तसं आपल्या शैक्षणिक सप्ताहाच्या शेवटच्या दिवसासाठी शैक्षणिक क्षेत्रातील गाढे ,अनुभव संपन्न आणि फिल्डवर सूचना किंवा चुका न दर्शवता त्या कशा होणार नाहीत यांचे मार्गदर्शक लाभले.
आभार प्रदर्शनाचे काम प्रा.श्री स्वप्नील लोटन पाटील यांनी केले.*
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी,माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष श्री प्रविण पाटील, भटूवानखेडे,उदय भाऊसाहेब, महाले सर,चेतन पाटील, आशिष निकम,रविंद्र धनगर, दिपक नांद्रे,हेमंत पाटील, योगेश भामरे.संजू पवार, अंबालाल पाटील, राहुल पाटील, नितीन सोनवणे,हितेश पवार यांनी केले.