विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा 24 जुलै 1945 जन्म दिवस…

अझीम प्रेमजी यांचा मुंबई मधील भारतीय मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला.

वडिलांचा व्यवसाय…

१९४५ साली अझीम प्रेमजींचे वडील हुसेन हाशिम प्रेमजी बर्माहून भारतात आले होते. त्यांना इंग्रजांच्या राजवटीच्या नियमांमुळे त्यांचा वर्षानुवर्षे जुना तांदळाचा व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे नवीन संधींच्या शोधात हाशिम प्रेमजी मुंबईपासून ३५० किमी अंतरावर असलेल्या जळगाव जवळ असलेल्या अमळनेरला पोहोचले. तेथे एका छोट्या भाजीपाला तेल मिलच्या मालकाला दिलेल्या कर्जासंदर्भात भेटायला गेले. गिरणी मालक कर्जाची परतफेड करू शकला नाही आणि त्याने हाशिम प्रेमजी यांना कर्जाऐवजी ऑइल मिल खरेदी करण्यास सांगितले. हीच संधी हशिम प्रेमजी शोधत होते. यानंतर भाताच्या व्यवसायातून ते तेलाच्या व्यवसायात आले.

हाशिम प्रेमजी यांना राईस किंग ऑफ बर्मा म्हणून ओळखले जात. पाकिस्तानचे संस्थापक मुहंमद आली जिन्हा यांनी अझीम प्रेमजी यांचे वडील मुहंमद हाशिम प्रेमजी यांना पाकिस्तानमध्ये आमंत्रित केले होते, परंतु त्यांनी ती विनंती फेटाळली व भारतातच राहणे पसंत केले.

अझीम प्रेमजी भारतातील दहा अतिश्रीमंत लोकांमध्ये येतात. २०१३ मध्ये त्यांनी द गिविंग प्लेज साइन करून त्यांची अर्धी संपत्ती दान करण्याचे ठरवले आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तर…

त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून इलेकट्रीकल इंजिनीयरींग या विषयामधून पदवी घेतली आहे. त्यांनी यास्मिन यांच्याशी विवाह केला.अझीम प्रेमजी यांनी ‘अझीम प्रेमजी फौंडेशन’ची स्थापना केली आहे. हे फौंडेशन भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी काम करते.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी १९४५ साली वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लि. सुरू केली. या कंपनी मध्ये सनफ्लॉवर वनस्पती या नावाखाली कुकिंग ऑइलचे उत्पादन घेतले जात, त्याचबरोबर ७८७ नावाने लौंड्री सोपची ही निर्मिती केली जात असे.

१९६६ साली वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अझीम प्रेमजी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून भारतात परतले व त्यांनी विप्रो कंपनीचा चार्ज घेतला. यावेळी ते २१ वर्षांचे होते.

१९८० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाची महत्व ओळखून या तरुण उद्योगपतीने उच्च तंत्रज्ञानाच्या निर्मितीस सुरवात केली. सेंटीने या अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने त्यांनी मिनी कॉम्प्युटरचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. याच काळात त्यांनी आपल्या कंपनीचे ‘विप्रो’ असे नामकरण केले. त्यांनी आपले सगळे लक्ष माहिती तंत्रज्ञानाकडे वळवले.

२०१० मध्ये, ते एशियावीक द्वारे जगातील २० सर्वात शक्तिशाली पुरुषांमध्ये निवडले गेले.
टाईम नियतकालिकाने दोनदा त्यांचा जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देऊन गौरव केला. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एडुकेशन ने २००० साली मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले. २००६ साली नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीयरिंग, मुंबई यांनी अझीम प्रेमजी यांना लक्ष्य बिझनेस व्हिजनरी या पुरस्काराने सन्मानित केले.बिझनेस वीक मॅगझीन ने विप्रो कंपनी ही जगातील सर्वात वेगवान प्रगती करणारी कंपनी व अझीम प्रेमजी यांची महान उद्योगपती म्हणून दाखल घेतली. २००९ साली मिडलटाऊन येथील वेसलेयन विद्यापीठ ने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन मानद विद्यावाचस्पती पदवीने सन्मानित केले. २०१५ साली म्हैसूर विज्ञापीठाने मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले. एप्रिल २०१७ साली इंडिया टुडे मॅगझिनने २०१७ सालच्या यादीमध्ये भारतातील ५० प्रभावशाली लोकांमध्ये अझीम प्रेमजी यांना ९ वा क्रमांक दिला.

अझीम प्रेमाजीनी स्थापन केलेल्या कंपन्या…

● विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टिम्स, १९९१
● विप्रो नेट, १९९९
● नेटक्रेकर, २०००
● विप्रो वॉटर, २००८
● विप्रो इकोएनर्जी, २००९

..श्री.अझीम प्रेमजी..
🎈..Happy..🎈
🌳..Birthday..🌳
वा|ढ|दि|व|स
अ|भि|ष्ठ|चिं|त|न
आपणास ઉदंड आયુષ્યાच्या,
अનંત શુभेच्छा…
आई जગदंब તુम्हाલા
ઉदंड आયુષ્ય देવૉ..!
पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, व समाजासाठी सत्कारणी लागो, हेच परमेश्वराकडे मागणे मागतो. आणि परमेश्वराने माझे मागणे पूर्ण करो.🙏🏻🌹
शुभजन्मदिनं तुभ्यम् l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]