मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील

ग्रामिण भागातील 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश,देखभाल दुरूस्तीसाठीही पावणे तीन कोटींचा निधी

अमळनेर:मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत टप्पा 2(बॅच 1)संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दरजोन्नती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून यात अमळनेर मतदारसंघातील खालील 5 रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.5897.87 लक्ष निधीतून ही कामे होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
विशेष म्हणजे या पाचही रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील 279.81 लक्ष निधी मंजूर झाला असून सदर पाचही रस्ते हे ग्रामिण भागातील अत्यंत महत्वपूर्ण रस्ते असल्याने जनतेची मोठी सोय होणार आहे.मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी एकापाठोपाठ निधी येत असल्याने नवीन रस्त्यांची मालिका साकारली जात आहे. सदर रस्त्यांच्या मंजुरीबद्दल मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन,पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ही आहेत रस्त्यांची कामे,,मुंगसे ते पातोंडा ते सोनखेडी ते निमझरी रस्ता एकूण लांबी 11.09 कि.मी रक्कम 1648.85 लाख हेडावे ते सुंदरपट्टी ते सडावन रस्ता एकूण लांबी 5.0 कि.मी रक्कम 655.18 लाख रा.मा 15 ते देवळी-देवगाव ते नगांव बु. रस्ता एकूण लांबी 3.600 कि.मी रक्कम 582.90 लाख कंकराज ते भोकरबारी ते शेळावे बु. रस्ता एकूण लांबी 7.08 कि.मी रक्कम 943.87 लाख सुमठाणे ते वडगाव ते बहादरपूर ते पुनगाव ते पारोळा रस्ता एकूण लांबी 14.210 कि.मी रक्कम 2067.07 लाख असे एकूण 40.980 कि.मी लांबी रस्त्यासाठी 5897.87 लाख रुपये व वरील सर्व रस्त्याच्या 10 वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी 279.81 लाख असे एकूण 6177.68 लाख(61 कोटी 77 लाख, 68 हजार) मंजूर झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]