डॉ.बी.एस.पाटलांना सुप्रमा कळत नसेल तर आता विश्रांतीच घ्यावी

राष्ट्रवादी काँग्रेस(अजितदादा पवार गट)चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा उपरोधिक सल्ला

अमळनेर: तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या डॉ.बी.एस.पाटलांना धरणाची सुप्रमा कळत नाही याचा अर्थ आमच्या त्या तीन टर्म वाया गेल्याचे स्पष्ट झाले असून,अगदी लहानात लहान कार्यक्रमांना देखील यांना बोलू दिले जात नाही,यामुळे त्यांनी सर्वच बाबतीत आता विश्रांतीच घेतलेली बरी असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस(अजितदादा पवार गट)चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी दिला आहे.
शरद पवार गटाचे डॉ. बी. एस. पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने भागवत पाटील यांनी पत्रक काढून त्यांचा समाचार घेतला आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की मुलांना संधी आणि आशिर्वाद द्यायचे यांचे वय असताना आताही ते स्वतःच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगतात हे योग्य आहे का?. खरेतर यांना कुणाचे चांगले बघवीलेच जात नसून यासाठी विरोध हा एकमेव अजेंडा त्यांनी ठेवला आहे.मंत्री महोदय अनिल दादांमुळे कोणती कामे मतदारसंघात मंजूर झालीत आणि कोणती पूर्ण झालीत हे जाहीर करण्याची गरज नसून उतरत्या वयामुळे जास्तीत जास्त वेळ घरात असलेल्या लोकांना ते काय कळणार,राहिला प्रश्न बजेट चा तर गेल्या मार्च च्या बजेटमध्ये पाडलसरे धरणाला जो निधी मिळायचा तो मिळाला असताना या बजेटमध्ये धरणाचे नाव का नाही असा सवाल उपस्थित करतात यावरून 15 वर्ष आमदारकी भोगून यांनी काय अभ्यास केला हे उघड झाले आहे.धरणाच्या सुप्रमा ला हे किरकोळ समजतात,जणू काय ती बाजारात विकत मिळते असे वक्तव्य करतात किती ही शोकांतिका.ज्याच्या कार्यक्रमात जायचे तेथे त्यांच्या मंचावरून काहीतरी वेगळे दाखविण्यासाठी त्यांच्याच विरोधात बोलयचे ही सवय झाल्याने अनेक ठिकाणी यांना बोलवायचे टाळले जाते आणि बोलावलेच तर भाषण तरी टाळले जाते अशीच परिस्थिती झाली आहे.ज्या स्वर्गीय उदय बापू वाघ आणि अनिल दादा यांनी त्यांना कार्यकर्ते म्हणून जोरदार पाठबळ दिले,ते कार्यकर्ते आज मोठे झाल्याने यांच्या डोळयांत ते खुपत असून त्यामुळेच विरोधात सतत असे बोलत असतात. प्रत्यक्षात शासकीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत, बस स्टँड, शहर व ग्रामिण भागात रस्त्यांची मालिका, दगडी दरवाजा, ग्रामिण रुग्णालयाचे नूतनीकरण, जलजीवन मिशन चे गावी गावी झालेल्या योजना, क्रीडा संकुल, बोरी, पांझरा व इतर नदी नाल्यावर बंधारे, नवीन सबस्टेशन, कोविड काळातील उल्लेखनीय कामे, पीकविमा, अतिवृष्टी व इतर शेतकरी अनुदान, शेतशिवार रस्ते अशी अनेक विकास कामे अनिल दादांमुळेच झाली हे आम्ही किती वेळा सांगणार.
त्या पत्रकार परिषदेला अनिलंदादा विषयी अजून काही जण बरळले त्यांच्या बाबतीत बोलण्याची आवश्यकता नसून गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा आकांडतांडव करूनही त्यांच्या उमेदवारांची काय परिस्थिती झाली यावरून त्यांची किंमत किती आणि अनिल दादांची किंमत किती हे सिद्ध झाले असून हा निवडणुकीचा काळ असताना यांची शहर व ग्रामिण ची बैठक एका छोट्याश्या सभागृहात होते,तेथेही खुर्च्या अपूर्ण खाली राहतात.यावरून आपले व आपल्या पक्षाचे वजन स्वतःच ओळखावे असा सल्ला देखील भागवत पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]