पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव

अमळनेर: दिनांक 17/07/24 वार बुधवार रोजी पोदार जंबो किड्सच्या बालगोपलांनी विठूनामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेऊन भक्तिरसाचा आनंद घेतला.
अभंग व भक्ती गीतांच्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात काय महत्व आहे हे प्रिन्सिपल नीलिमा कुडे यांनी मुलांना गोष्टीरुपात सांगितले. तसेच संतांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थी वारकरी , विठ्ठल , रुक्माई यांच्या सुंदर वेशभुषा परिधान करून आले होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास सर्व पालकवर्ग , शिक्षक वृंद श्रुती पाटील, अर्चना शिंगणे, जयश्री पाटील यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]