

अंमळनेर: प्रकाश (भाई)पाटील युवा मंच,अमळनेर तर्फे आयोजित तालुक्यातील सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या सर्व शाखेतून उत्तीर्ण झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाची सांगता ही आपल्या जनसंपर्क कार्यालयात शेकडो प्रमाणपत्र वाटून केली.त्यात जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन-क्रिमिलियर आणि अधिनिवास प्रमाणपत्र ही होती. यावेळी विद्यार्थीची आणि पालकांची प्रसन्नता पाहून विद्यार्थ्यांचा आनंद हेच माझे ध्येय! यातून माझे मन खूप सुखावले याचीही जाणीव झाली.
विशेषतः मुलींनी आपले मत मांडताना असे म्हटले की आमची जी जास्तीची आर्थिक लूट,वेळेची बचत आणि भर पावसात जो फिरण्याचा त्रास होणार होता,तोही तुम्ही कमी करून प्रमाणपत्रे ही वेळेच्या आधी उपलब्ध करून दिली याबद्दलही प्रथमत: आपले आभार व्यक्त करतो श्री प्रकाश पाटील यांनी आपला पोलीस विभागातील जीवन प्रसंगाचा अनुभवाचा आढावा देऊन,तुम्हीही आई-वडील आणि स्वतःची स्वप्न साकारण्यासाठी कठीण परिश्रम आणि अभ्यास करणे हाच एकमेव पर्याय आहे आणि तो तुम्ही आतापासून अंगीकारावा याची जाणीव करून दिली.याप्रसंगी काही विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या पालकांनी प्रमाणपत्र स्वीकारून श्री पाटील यांचे आभार व्यक्त केले