

अमळनेर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत खान्देश विभाग उपाध्यक्ष पदावर प्रा डॉ विजय तुळसाबाई शालिग्राम गाढे यांची निवड करण्यात आली व अमळनेर तालुका अध्यक्ष पदी समाधान मैराले यांची निवड करण्यात आली


सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी प्रा डॉ विजय गाढे यांच्यातील नेतृत्व गुण व पत्रकाराना न्याय मिळवून देण्याची अभ्यासू वृत्ती पाहून त्याची पत्रकर संघटनेच्या खानदेश विभाग(नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार) च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यांना पाचोरा येथील विश्राम गृहात झालेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीत खान्देश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा, खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवणेश दुसाने,जळगांव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नागराज पाटील,उपाध्यक्ष नंदकुमार शेलकर,पाचोरा तालुका अध्यक्ष नितीन पाटील,शहर अध्यक्ष प्रा अमोल झेरवाल, भडगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद पवार,अमळनेर तालुका अध्यक्ष समाधान मैराले,सुरेश कांबळे,नूर खान,आत्माराम अहिरे या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडी बद्दल प्रा. डॉ. विजय गाढे व तालुखा अध्यक्ष समाधान मैराळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.