संजय बच्छाव हे स्व.वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार 2024 ने सन्मानित

शेतकरी मित्र व कांदा उत्पादक संघटनेचे साक्री तालुका अध्यक्ष श्री संजय बच्छाव हे स्व.वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार 2024 ने सन्मानित

साक्री ( प्रतिनिधी ): तालुक्यातील दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे साक्री तालुका अध्यक्ष व निसर्ग मित्र समितीचे उपाध्यक्ष श्री संजय बच्छाव यांना ऍग्रो केअर कृषी मंच नाशिक आयोजित1 जुलै कृषी दिन व ॲग्रो करिअर संस्थेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्ताने स्व.वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री संजय बच्छाव यांनी शेतकऱ्यांसाठी व सामाजिक कार्यासाठी चांगल्या प्रकारे योगदान दिले.
तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण केली, रस्त्यावर उतरून आंदोलन केली व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तसेच शेतकऱ्यांचे शेतातील ट्रांसफार्मर जळाले तर महावितरण कंपनीशी लढून त्यांनी 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले. आजपर्यंत त्यांनी दहिवेल परिसरात व गावात 100 हून अधिक ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत.
तसेच निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपणाचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन
दि.1 जुलै कृषी दिन व शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने नाशिक येथीलऍग्रोकेअर कृषीमंच चे चेअरमन मा.श्री भूषण निकम साहेब व संचालिका मा. रोहिणी पाटील यांनी मा. आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते कृषी दिनानिमित्त दहिवेल येथील शेतकरी श्री संजय बच्छाव यांचा व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कृषी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान केला.
श्री संजय बच्छाव यांना या अगोदरही 2022 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार व राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार तसेच कोरोना काळात कोरोना योद्धा पुरस्कार मिळाले आहेत.
व एक जुलै रोजी कृषी दिनानिमित्त कृषी प्रेरणा 2024 हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांना त्यांच्या मित्रमंडळी, आप्तेष्ट नातेवाईक व गावातील शेतकरी बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तसेच त्यांचे श्रद्धास्थान शेतकरी मित्र किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री बिंदू शेठ शर्मा यांच्याकडून त्यांना वेळोवेळी चांगले मार्गदर्शन मिळाले व मदत मिळाली.
श्री बिंदू शेठ शर्मा यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊन असेच पुरस्कार कायम मिळत राहो असा आशीर्वाद दिला.
“शेतकरी बांधवांच्या कृपाशीर्वादाने मला हा पुरस्कार मिळाला म्हणून मी श्री संजय कालेश्वर बच्छाव हा पुरस्कार आपल्या सर्व शेतकरी बांधवांना समर्पित करीत आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]