महापुरुषांच्या विचारांमुळे आपलं जीवन बदलू शकते.  प्रा.अशोक पवार

युवा कल्याण प्रतिष्ठान व राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून झाली १०४ व्याख्याने..

अमळनेर: राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर केलेलं काम, समाजसेवेचं काम, सर्वक्षेत्रात या देशाच्या प्रगतीसाठी केलेलं काम, विशेषत: समतेचा विचार जगभर पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहूया, हीच राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल, असे भाविका वाल्हे हिने महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी येथे आयोजित राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होती..
ती पुढे म्हणाली की शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूर संस्थानात गावोगावी शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेमध्ये पगारी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरू केली. शाहू महाराजांच्या या कार्यामुळे खेड्यापाड्यातील सामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले असे इयत्ता नववीतील डि.आर.कन्या शाळेची भाविका वाल्हे या विद्यार्थ्यांनींने उत्कृष्टवक्ता म्हणून आली असता आपले मनोगत व्यक्त करत श्रोत्यांची मन जिंकली..
व्यासपीठावर प्रा. अशोक पवार, शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन,आय.आर.महाजन, एच.ओ.माळी होते. अगोदर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला..
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना प्राध्यापक अशोक पवार म्हणाले की शाहू महारांजानी वेगवेगळ्या जातीची वस्तीगृह निर्माण केली ..वस्तीगृहामध्ये मुलांना राहण्याची सोय केली आणि त्यातून सुरुवातीला 1700 मुलांपासून सुरुवात झाली शाहू महाराज 1922 ला गेले त्यावेळेला 22 हजार विद्यार्थ्यांची संख्या झाली होती.. म्हणजे 22 हजार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचे काम शाहू महाराजांनी केले.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की शाहू महाराजांची जयंती उत्सव म्हणून साजरी करा तसेच दिवाळी आपण साजरी करतो तशीही जयंती साजरी करा असे युवा कल्याण प्रतिष्ठान व राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचे अध्यक्ष
प्रा.अशोक पवार यांनी सांगितले..
ते म्हणाले की युवा कल्याण प्रतिष्ठान राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत मागच्या वर्षी पण शंभर ठिकाणी शंभर व्यक्तींनी भाषण केली..ती पण एकाच दिवशी.. यावर्षी तर 104 ठिकाणी शाहू महाराजांची जयंती साजरी झाली आज 104 व्याख्यानांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यामध्ये धरणगाव , पारोळा , एरंडोल तालुक्यामध्ये अशी 104 ठिकाणी व्याख्यानातून सुमारे 25000 विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचा कर्तुत्व ऐकण्याची व्यवस्था या अभियानाच्या माध्यमातून झाली.. महापुरुषांच्या विचारांमुळे आपलं जीवन बदलू शकतो आपल्या वैयक्तिक प्रश्न सोडवू शकतात आपले कौटुंबिक प्रश्न सुटू शकतात एवढी ताकद या महापुरुषांच्या विचारांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले..
कार्यक्रमात मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक ए.जी.महाजन यांनी मानले तर सूत्रसंचालन आय.आर.महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]