अमळनेर : येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल आणि जुनियर कॉलेज येथे दिनांक 26/06/2024 रोजी राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री महेश पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर घनश्याम पाटील सर व प्राध्यापक भरत परदेशी सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर घनश्याम पाटील यांनी मुलांना उच्च शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. प्राध्यापक भरत परदेशी यांनी राजश्री शाहू महाराजां विषयी मुलांना माहिती सांगितली. तसेच प्राध्यापक भरत परदेशी यांनी मुलांना खाऊ वाटप करून मुलांना प्रोत्साहित केले. शाळेच्या शिक्षिका सोनाली शशिकांत पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता झाली.