जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एकावर अमळनेरात गुन्हा दाखल

अमळनेर : शहारातील पैलाढ भागातील एकाने जातीय तेढ निर्माण होईल असे लिखाण इन्स्टग्राम या सामाजिक माध्यमावर केले होते. यावर आक्षेप घेत समाज बांधवांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात आपत्तीजनक पत्रक वाटण्यात आले होते. तर त्या विरुद्ध नाशिक शहरात आंदोल करण्यात आले होते. या आंदोलनाच्या विरोधात व विशिष्ट समाजाच्या विरोधात इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमावर जातीय तेढ निर्माण होईल असे लिखाण केले होते. ही बाब अमळनेर शहरातील समाज बांधवांना कळताच त्यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठले व स्वप्नील सुरेश पाटील रा. पैलाढ अमळनेर या तरुणावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार 3 (1) (r), 3 (1)(s) तसेच भारतीय दंड संहिता 295(A) व 506 नुसार गौरव सुधाकर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]